Tuesday, September 6, 2011

Charolya

डोळ्यांचा दिवा मावळला की..
स्वप्नांची पाखरं जागी होतात,
तुझ्या गोड आठवणींचा एक एक
क्षण टिपून घेतात..


आज सकाळपासुन पाऊस येत होता,
कुणी भिजतंय का? कानोसा घेत होता,
मी म्हटलं, ती भिजत होती, मी बघत होतो,
ती भिजत असताना, मी एकेक क्षण जगत होतो!


नक्कीच पावसाचं काहितरी बिनसलयं,
असा बेफाम कोसळतोय,
त्याचही कुणितरी हरवल्यासारखं,
आठवुन मनसोक्त रडतोय!

मैत्रेय(अमोल कांबळे)


जीवनातील काही क्षण असेच असतात,
आपले नसूनही आपलेसे वाटतात
काळाच्या प्रवाहात वाहूनही जातात,
पण हृदयाच्या कप्प्यात चिरंतर असतात.

सिंदू




No comments:

Post a Comment