Thursday, September 8, 2011

रांजणगावचा महागणपती

Like : (http://www.facebook.com/pages/Ranjangaon-Ganapati/267618853263249)

हे क्षेत्र भगवान शंकरांनी वसविले असून त्यांनीच गणेशमूर्तीची येथे स्थापना केली. गृत्समद ऋषींचा पुत्र त्रिपुरासुर हा गणेशाने दिलेल्या वरामुळे अतिशय उन्मत्त झाला होता. त्याने सर्व देवानाही जिंकले. सर्व देवांच्या विनंती वरून भगवान शंकराने या दैत्याचे पारिपत्य करण्याचे मान्य केले. शंकराने विनायकास प्रसन्न करून घेतले. कार्तिक शुद्ध पौर्णिमेस याच ठिकाणी शंकराने त्रिपुरासुराचे पारिपत्य केले. त्या वेळपासून या पौर्णिमेस त्रिपुरी पौर्णिमा म्हणण्यात येऊ लागले. पेशव्यांनी येथील अन्याबा देवांना वंश परंपरागत देवाची पूजा करण्याची सनद दिली. मोरया गोसावी यांनी अन्याबा देवांना गणेशाची धातूची मूर्ती प्रसाद म्हणून दिली. त्या मूर्तीची उत्सवात मिरवणूक निघत असते.

भाद्रपद महिन्यात येथे घरोघरी गणेशाची स्थापना करण्याची प्रथा नाही तर मंदिरातील गणेशाची पूजा केली जाते. श्री व्यंकटेश हाच्रीच, पुणे यांच्या वतीने रोज सकाळी शिरा वाटप करण्यात येते. अष्टविनायकातील सर्वात शक्तिमान असे मानल्या जाणा-या महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराचे बांधकाम पेशवेकालीन पद्धतीचे आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की उत्तरायण व दक्षिणायन याच्या मधल्या काळात सूर्याची किरणे महागणपतीच्या मूर्तीवर पडतात. मंदिराचे प्रवेशद्वार भव्य असे असून प्रवेशद्वारावर जय-विजय हे द्वारपाल आहेत. मंदिरातील सभामंडपातून आत गेल्यावर गाभा-यात महागणपतीची डाव्या सोंडेची मूर्ती आहे. गणपतीने कमळाची आसनमांडी घातलेली
आहे. गणपतीला दहा हात आहेत. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. मंदिराचे स्थान इ. स. दहाव्या शतकातील आहे .

स्थान : तालुका शिरूर, जिल्हा पुणे, हे स्थान पुणे- अहमदनगर राज्य मार्गावर आहे.

अंतर : रांजणगाव-पुणे ५० कि.मी., रांजणगाव-शिरूर १७ कि.मी., जवळच्या हायवेपासून पुणे- सोलापूर मार्गावरील चौफुला येथे जाता येते. आणि चौफुल्याहून थेउर, मोरगाव , व सिद्धटेकला जाता येते. 

पुणे मार्गावरील प्रेक्षणीय ठिकाणे : वढू बुदृक - भीमा नदीवर श्री संभाजी महाराजांची समाधी, कोरेगाव पासून पाच कि.मी. आत.

तुळापुर :  भीमा, भामा व इंद्रायणी या नद्यांचे संगम स्थान.

फुलगाव : श्रुतीसागर आश्रम.

अहमदनगर मार्गावरील ठिकाणे : शिरूर- प्राचीन श्री रामलिंग मंदिर.

निघोज :  कुकडी नदीच्या पत्रात कुंडच्या आकाराचे नैसर्गिक खळगे. श्री मळगंगा देवीचे जागृत स्थान.

No comments:

Post a Comment