Monday, September 5, 2011

देशील तेव्हा ओळख

तशी मैत्रीला बंधने नसतात
पण अजूनही एक मुलगी आणि एक मुलगा
कायम मित्र नसतात...
... ... कितीहि चांगली मैत्री असली तरी
भविष्यात थोडी तरी बंधने जखडतात..

सहवास कमी होतो,कोणी हक्काचा असेल तर
त्याचा हस्तक्षेप होतो
एक टिफिन शेअर करायचा विचार
पण मनात वाईट आणून जातो
हक्काने पाठीत थाप मारताना
हाथ थोडा मागे येतो

मित्राला पण वाटते कि
त्याच्या मुळे त्याच्या मैत्रिणीच्या
आयुष्यात वादळे नको,
मी त्यांच्यात तिसरा नको

कधी मित्राच्या आयुष्यात पण कोणी आली
तर तो मैत्रिणीशी ओळख करून देतो
तेव्हा तिला पण थोडे जलस फील होऊन जाते
आपल्या नवर्याला आपल्या पेक्षा कोणी मैत्रीण
जास्त जवळची आहे असे तिला पण वाटायला लागते

असे दोन मुलांच्या मैत्रीत, किंवा दोन मुलींच्या मैत्रीत कधी होत नाही
पण एक मुलगा आणि एक मुलगी का कायम चांगले मित्र असू शकत नाहीत

समाजाची बंधनांना कधी ते पण बळी पडतात
पुन्हा कधी एकमेकांच्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाहीत
आपल्या आपल्या मार्गाने पुढे जातात
पण सामोरा समोर चुकून कधी आले
आणि ते पण आपल्या जोडीदाराबरोबर
तर ओळख तरी देतील का?
कधी हक्काने सांगतील आपल्या मैत्रीचे किस्से,
का मनात सगळ्या आठवणी घेवून तसेच पुढे चालतील?
अनोळखी असल्यासारखे वागतील?
जोडीदाराला चांगले वाटणार नाही म्हणून
तसेच पुढे जातील,
मग जुन्या सगळ्या आठवणी डोळ्यांसमोर येतील

मग वाटेन दिली असती ओळख तर बरे झाले असते,
निदान तू सुखी आहेस का हे तरी विचारले असते.....

No comments:

Post a Comment