जीवनाच्या वाटेवर आपण एकमेकांचा हात धरला होता
जीवनाच्या वाटेवर आपण एकमेकांचा हात धरला होता
पण का कोणास ठाउक तो नंतर सैल होत गेला
यशाच्या मागे तुला धावायचं होत
पण मला मात्र संसारात रमायचं होत
तरीही तुझ्यासोबत पळण्याचा मी खूप प्रयत्न केला
... अशीच दम छाक होऊन मग तुझा हात माझ्या हातातून निसटत गेला
मी मागे मग कुठेतरी तुझी सावली बनून राहिले
पण यशाच्या ओघात तू या सावलीलाही सोडून दिले
आज तू दूर कुठेतरी हरवला आहेस,आपण एकाच वाटेवर असूनही
अजूनही कोरडीच कशी रे मी , पाउस सोबतीला असूनही?
No comments:
Post a Comment