Monday, September 12, 2011

मनापासून

मेहंदीलाही रंग चढला होता

तुझ्या तळव्याचा स्पर्श

ज्याच्या नावाने लावतेस मेहंदी

नाव त्याचे हर्ष

....मनापासून
*
स्पर्श तुझ्या मनाला

केला माझ्या कवितांनी

बदलल तुझ सार जग

एका एका शब्दांनी

मनापासून
*
शब्द जेव्हा जड होतात

अंतःकरण हेलावते

भावनांचे दुःख मग

पापण्यांना ओलावते

मनापासून
*
अश्रुंचा भार

पापण्यांनाच सहावा लागतो

रात्रीच्या शीतलतेसाठी

चंद्र रात्रभर जागतो


मनापासून
*
दाराच्या फटीतून आला होता

चंद्र प्रकाशाचा कवडसा

जाणवतो त्याचा सहवास

बंद खोलीत दिवसा

मनापासून
*
सहवासासाठी तुझ्या

आतुरल मन माझ

बंद खोलीत हलकेच

न्याहाळल तन तुझ

मनापासून
*
भास त्याच्या असण्याचा

पसरतो जसा चराचरात

तान्हुला कृष्ण तो

यशोदा माईच्या घरात

मनापासून
*
राधेपेक्षा जास्त त्याच प्रेम

बासरीवरच होत

राधेशिवाय दुसर कुणी

त्याच्या ध्यानीमनी नव्हत

मनापासून
*
विरहाचे गीत तिच्या

ओठांवर का विसावले

गुलाबानेही काट्यांचे व्रण

तिच्या बोटांवर ठसवले

मनापासून
*
विरहाच्या अग्नीत

कितवर आता जळायच

किती आठवण येते मला

हे तिला कधी कळायचं

मनापासून
*
रोजच तुझ आठवणीत येन

कुशी पालटून माझ रात्र जागण

कळलंच नाही मला कधी

काजव्याच्या पाठी प्रकाशाच लागण

मनापासून
*
सरत्या रात्रीला निरोप देई

पहाटेची भूपाळी

चंदनाचा टिळा लागला

सिद्धिविनायकाच्या कपाळी

मनापासून
*
मंद मंद ओघळणारा प्रकाश

त्यात दिसणारी तुझी सावली

चंद्रबिम्बित प्रतिमा तुझी

मनाला माझ्या भावली

मनापासून
*
माझ्यासारखा तर फक्त मीच आहे

दुसर्यांना दुःख देणारा

त्यांच्या मनाला दुखवताना

त्या दुःखात आनंद घेणारा

मनापासून
*
वेदनेलाहि कळत

कोणाला दुखवायचं ते

आपल अस्तित्व कस,हे

कोणाला दाखवायचं ते

मनापासून
*
प्रेमामध्ये वेदना या

प्रत्येकालाच त्रास देतात

कधी कधी तर एखाद्याच

प्रेमच त्या हिरावून घेतात

मनापासून
*
प्रेमाच्या या मेघांनी

बरसात केली प्रेमाची

अशी किती काढतो आठवण

परवाना...... शमाची ?

मनापासून
*
वेदना झाली कि मनही असच

आभाळासारख भरून येत

आभाळ ढगांवरून तर वेदना

चेहर्यावरून कळून येते

मनापासून
*
डोळ्यातल्या आसवांना

कस त्याने ओळखाव

संसाराच्या पाशाने

गळ्याभोवती विळखाव

मनापासून
*
संसार म्हणजे काय

दोन आत्म्यांचा मेळ

आजकाल सारेच समजतात

याला भातुकलीचा खेळ

मनापासून
*
सारच इथे फसव आहे

आपणही स्वताला फसवतो

गोड गुलाबी स्वप्नात

मनाला नेऊन वसवतो

मनापासून
*
कधीतरी स्वतःच्या मनाप्रमाणे वाग

त्याच्याच मनासारख वागू नकोस

तो देत असेल तर त्याला देऊ दे

उगाच उसण प्रेम त्याला मागू नकोस

मनापासून
*
ओठही हलले होते

नजरही बोलली होती

मी जिच्या प्रेमात पडलो

ती तर तिची सावली होती

मनापासून
*
माझ्या रूपावर भाळून

हरवलीस तू माझ्या नजरेत

एकही श्व्वास तू माझ्या

आठवणींशिवाय नाही घेत

मनापासून
*
किती वाट पाहशील

माझ्या घरी येण्याची

आता झाली आहे वेळ

स्मशानात मला नेण्याची

मनापासून
*
तुझ्या श्वासावरच तर

माझ हृदय चालत आहे

तुझ्याच नावाचा मंत्र ते

रात्रंदिवस बोलत आहे

मनापासून
*
आपल्या दोघांचाही

वेगळ अस नात आहे

तुझ्या हृदयाच्या कप्प्यात

माझ बचत खात आहे

मनापासून
*
चांदण्यांच्या वर्षावात

नक्षत्रांचा सडा पडलेला

तो बघ,टिपायला चंद्रबिंब

चकोर आकाशी उडलेला

मनापासून
*
चांदण्यांची मिठी

चंद्राला कशी सोडवेल

विरहाच दुख मग

त्याच्या माथी ओढवेल

मनापासून
*
प्रेम आहे तिथे

विरह असणारच

जिथे विरह नाही

प्रेम तिथे नसणारच

मनापासून
*

सहवासाने माझ्या

काटेच तुला मिळणार

समाजसेवक आहे मी

हे कधी तुला कळणार

मनापासून
*
कट्याकुट्यानि बनली आहे वाट

पार करावे लागतील असंख्य घाट

चालतेस का माझ्याबरोबर

या झाडाझुडपातून दाट

मनापासून
*
ओठांची लाल लाली

झाली आता चुंबनात ओली

हातांच्या विळख्यात माझ्या

तुझी काया धुंद झाली

मनापासून
*
बालपणीचे खेळ खेळताना

मनही लहान होत

खेळात इतके गुंतलो कि

कोणालाही भविष्याच भान नव्हत

मनापासून
*
उद्यामध्ये आपला

आज असतो लपलेला

उद्याचा पोर्ण दिवस असतो

कालच्या गोष्टीनी व्यापलेला

मनापासून
*
होळीत होते जशी

रंगांची उधळण

तुझ्या येण्याने आयुष्याला मिळालं

एक नवं रंगीतदार वळण

मनापासून
*
हाती घेतलेलं काम आपण

पूर्ण तर करायचं

कीर्ती मागे ठेऊन

सर्वांच्या मनात उरायचं

मनापासून
*
वळणदार घाटावर या

हळूच कुशीत तू यावे

डोळे मिटले असता तू

चुंबन तुझे घ्यावे

मनापासून
*
जिथे जिथे पाहशील

तिथे तिथे मी असेन

मिटलेल्या पापण्यातही

तुला मीच दिसेन

मनापासून
*
आसवांनी माझ्या

व्यथा सर्वांसमोर मांडली

प्रत्येक थेम्बातून माझ्या

कथा थेंब थेंब सांडली

मनापासून
*
माझ्या प्रत्येक शब्दात

एक वेगळीच अदा आहे

म्हणूनच माझ्या शब्दांवर

प्रत्येकजण फिदा आहे

मनापासून
*
मी काहीच हेरत नाही

शब्दच प्रेमात पाडतात

याच शब्दांमुळे

मित्र-मैत्रिणी माझ्या वाढतात

मनापासून
*
शब्दांचा अभिषेक

आज तुला घातला

प्रत्येक शब्दामध्ये

प्राण मी ओतला

मनापासून
*
भडकली शमा

परवान्याच्या मिलनासाठी

दिली होती पहाटेची वेळ

जंगलात नदीकाठी

मनापासून
*
प्रकाशाचे किरण

पसरले अंधार्या खोलीत

एक नजाकत होती

तिच्या त्या हळुवार बोलीत

मनापासून
*
मोत्यांची सौन्दर्यता जशी

शिम्पल्याने जपली

तिची प्रत्येक अदा

त्याच्या शब्दात आहे लपली

मनापासून
*
प्रत्येक शिंपल्यात मोती नसतो

काही रिकामीही असतात

नशीबवान असतात ते शिंपले

ज्यात मोती येऊन वसतात

मनापासून
*
जगाच दुःख तू पाहू शकते

माझ दुःख का नाही दिसत

कदाचित त्यांच्या दुःखामध्ये

माझ नाव नाही बसत

मनापासून
*
वार्याची एक झुळूक

माझ्या केसांना खूप छळते

हळूच स्पर्श करून "बटांना"

बघ कशी दूर पळते

मनापासून
*
सख्याची या सखी

आसवातच हरवली आहे

जेव्हापासून वडिलांनी

तारीख लग्नाची ठरवली आहे

मनापासून
*
अश्रुंचे शब्द फक्त

हृदयावर उमटतात

थेंब थेंब ठीबकताना

डोळे अलगद मिटतात

मनापासून
*
रिमझिम पडणा~या

पावसाच्या सरीला

काल पहले भिजताना

त्या नाजूक "परीला"

मनापासून
*
कापरासारखच माझ आयुष्य

दुसर्यांसाठी कामी आल

ज्योत बनून जळताना

केव्हाच ते तुझ्या नामी झाल

मनापासून
*
प्रत्येक क्षण तुझ्या भेटीचा

पाझरतो आहे डोळ्यातून

जसा गंध पसरतो सुगंधी

फुलांच्या पाकळ्यांतून

मनापासून
*
दो कदम ही साथ उनका

फिर अकेले ही चलना है

दुनिया का अँधेरा मिटाने के लिए

सूरज को रोज जलना है

......मनापासून
*
हास्यातील ती मुग्धता

ओठातील स्निग्धता

डोळ्यातील खिन्नता

नजरेतील लीनता ....तडपवते मला

......मनापासून
*
तुझ्या मनीच चांदण

नक्षत्रांच्या निळ्या गावी

सजवली आहेत स्वप्ने मी

सुखी संसाराची भावी

मनापासून
*
दोन श्वास एक झाले

दोन मन एक झाले

परतीच्या मार्गावर

दोघांच्याही डोळ्यात पाणी आले

मनापासून
*
आत्म्याच जेव्हा आत्म्याशी

आत्मीयतेने मिलन होत

माझ तुझ्याशी झालेलं

दुसर काही नसून प्रेम होत

....मनापासून
*
मनसोक्त आनंद घे

मिळालेल्या या जीवनाचा

प्रत्येक क्षण जागून घे

मिळालेल्या या यौवनाचा

मनापासून
*
सुख म्हणता म्हणता

दुखाचे सावट पसरले

या दुखातून बाहेर येण्याचा

मार्ग मात्र विसरले

मनापासून
*
कितीही छळ केला जगाने

तरी तू मात्र कोणाला छळू नकोस

संकटाना घाबरून

पळपुट्यासारखा पळू नकोस

......मनापासून
*
घटस्फोट घेऊन शेवटी

एकटच राहण आल नशिबी

पश्चाताप होतो मग

आसवांना येते "जन्मांची" गरिबी

मनापासून
*
मखमली गालिच्यावर तिची

मउ मउ पावलं

प्रेमाच वेड तिच्या पावलांनी

गालीच्यालाही लावलं

मनापासून
*
मौनातल अबोलेपण

मनाला खूप भावत

प्रेमातल्या शब्दांना

ते ओठातच ठेवत

मनापासून
*
सार काही गमावल्यावर

हाती काही उरलच नाही

कुणास ठाऊक का पण

चांदण्यांनी आभाळ

आज भरलच नाही

मनापासून
*
वळून मागे पाहताना

पावलांनी का थबकावे

उगाच का कोणी घेते

झोपाळ्यावर हेलकावे

मनापासून
*
निशिगंधित मन माझे

तुझ्यावर का भाळावे

प्रेमातल्या मर्यादाना

कितवर मी पाळावे

मनापासून
*
फुलांच्या गावी

सुगंधाचा सडा

प्रेम करून मग

आयुष्यभर रडा

मनापासून
*
रत्नमालेतील प्रत्येक मोती

तुझ्या आसवांनी बनलेला

प्रेमाचा हा अतूट धागा

मैत्रीच्या बंधनाने विनलेला

मनापासून
*
परतीची हि वाट

चालण्यास खूप अवघड आहे

तुझ नि माझ नाव ज्यावर कोरलेल

हाच तो दगड आहे

मनापासून
*
सर्वात असूनही मी

माझ्या मनात तूच आहे

बंधनात अडकलेल्या

तुझ्याहि मनात मीच आहे

मनापासून
*
तुझ्या प्रश्नांची उत्तरे

तुला तुझ्यातच मिळतील

मी सहन केलेल्या वेदना

त्या उत्तरातून कळतील

मनापासून
*
मनाच बागडण कस

स्वछंदी असाव

सोनेरी पंखात त्याच्या

रूपेरी चांदण्यांनी वसाव

मनापासून
*
मनातल्या वेदना

ओठांवर कधी येत नाहीत

याचा अर्थ असा नाही कि

तुला वेदनाच होत नाहीत

मनापासून
*
बरसल आज मेघ

अतृप्त या धरतीवर

तृप्त करून धरतीला

निघाल ते परतीवर

मनापासून
*
काळोखी हि रात्र

वाचतोय तीच पत्र

नकार मिळताच तिचा

सरल प्रेमाच सत्र

मनापासून
*
सर्वांनी तारीफ केली

पण तुझीच "वाहवा" नाही मिळाली

अस वाटत कि तुला

माझी कविताच नाही कळाली

मनापासून
*
कौतुकाचे बोल समोरच्याला

प्रेरणा देतात उत्तुंग भरारीची

त्यासाठी करावी लागते मेहनत

जीव तोडून "करारीची"

मनापासून
*
अल्पभाषी मी असलो तरी

शब्दातून बरच बोलतो

अवघड या वाटेवर

चारोळ्यांच्या "संगतीने" चालतो

मनापासून
*
कोसळता ओल्या सरी

मनही माझे भिजले

हात तू धरताच माझा

मन चिंब चिंब लाजले

मनापासून
*
नजरेचे तीर नको असे मारूस

हृदयाला माझ घायाळ होत तीरानी

दुख झाले तुझ्या सोडून जाण्याचे

दुखावलेल मन गात आहे विराणी

मनापासून
*
निरागस तुझ वागण

निरागसतेला कवटाळून जगन

हीच निरागसता कायम ठेव

हेच माझ मागण

मनापासून
*
सख्या जिवलगा

तुजवीण काही करमेना

तुझ्यासोबत कुठेतरी

दूर मजला नेना

मनापासून
*
रुजते प्रेमाचे बीजांकुर

योग्य वेळी प्रत्येकाच्या मनात

प्रत्येकजण खेळतो

प्रेमाची खेळी तरुणाईच्या वनात

मनापासून
*

ओलावालेत चक्शुही

आठवण तुझी येता

येशील का रे साजणा

साद तुजला देता

मनापासून
*
"चतकोर" भाकरीसाठी
लोक लाचार बनतात
पोटभर खायला न मिळणे
यालाच तर गरिबी म्हणतात
मनापासून
*
टपोऱ्या मोत्यांची माळ
तुझ्या गळी घातली
तुझ्या सौंदर्यापुढे
माळ "फिकी" वाटली
मनापासून
*घायाळ करते अदा तुझी न्यारी
नजरेचे" शर" हृदयामध्ये घुसवण
ओठांचे ठसे गालावर ठसवण
तुझी हीच अदा आहे मला सर्वात प्यारी
मनापासून
*
निळा रंग आकाशाचा
नदीच पाणी नीळ करतो
सप्तरंगी इंद्रधनुष्य
रंगाविना फिका उरतो
मनापासून
*
चाफ्याचा गंध
घेउनिया श्वासांमध्ये
सळसळले रक्त
हिरव्या नसांमध्ये
मनापासून
*
कुठेतरी असेल ती

जी फक्त माझ्यासाठी बनली आहे

चारोळ्यांची हि बरसात

तिच्यासाठीच आणली आहे

मनापासून
*
अंथरले होते नक्षत्र रूपी ढग

अथांग निळ्या सागराने

किती उपसशील पाणी तू

इवल्याश्या या घागराने

मनापासून
*
तराणे तिच्या "गझलेचे"

ऐकायला तरसले कान

एकचित्त झालो मी

विसरून सार भान

मनापासून
*

No comments:

Post a Comment