आज समजते आहे तुझे माझ्या आयुष्यात येण्याचे महत्व. . .
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg4IEO3gY_z9qTU73jm1H_RszQxypfZcvm4XWeDhxjFaPL_BpnwPVzL_rn1eEphPVLEsfpmaCwVAtmVmHvgB7bmkR6OqES4YiI1-L1ptJuhnyX842bw3rimpoQ5tDWzXLQIi0ZhTGnch6o/s320/images-737780.jpeg)
आज समजते आहे तुझे माझ्या आयुष्यात येण्याचे महत्व. . .
देवाने का माझी अन तुझी भेट घडवली ते. . .
त्या दुःखाच्या चक्रव्युहात अडकलो होतो मी. . .
त्यातून बाहेर काढलेस तू मला,
... आपले मानलेस. . .
तुझे प्रेम दिलेस. . .
जीवन जगायला शिकवलेस. . .
थकून गेलेल्या मनाला
ऊभारी दिलीस. . .
लढायला शिकवलेस मला. . .
जीवनात सतत झिडकारलो गेलो होतो मी. . .
सतत हरत आलो होतो मी. . .
अशा माणसांचे तर नशिबसुध्दा साथ सोडते,
पण. . .
पण तु साथ सोडली नाहिस माझी. . .
माझ्या नशिबाशी लढलीस. . .
केवळ आणि केवळ
माझ्या सुखासाठीच. . .
आयुष्यात नेहमी दुःखच मिळाले होते गं,
त्यामुळे हसणेच विसरून गेलो होतो. . .
निस्तेज झालेल्या
डोळ्यात अश्रु आणि अधु~या राहीलेल्या
स्वप्नांशिवाय काहीच नव्हते राहीले. . .
पण. . .
पण तू त्या डोळ्यांना
नवसंजीवनी दिलीस,
पून्हा नवं स्वप्न पाहायला
शिकवलंस मला,
सर्वांनी पाहून पण
न पाहिल्यासारखे
केलेल्या त्या
माझ्या अश्रुंना मोत्यासमान महत्व दिलेस तू. . .
गर्दित राहूनही अलिप्त
राहत होतो मी,
सर्वांनीच सोबत नाकारल्यामुळे
एकटा पडलो होतो,
स्वतःचे अस्तित्वच विसरून गेलो होतो मी. . .
पण. . .
मला माझीच ओळख करुन दिलीस तू. . .
सुखात तर सर्वच जण साथ देतात गं पण दुःखात साथ देणारी तू एकमेव आहेस. . .
किती केलेस गं माझ्यासाठी. . . ?
माझ्या सुखासाठी
माझ्या त्या एका एका
अश्रुच्या थेंबासाठी
आपले सर्वस्व पणाला लावलेस. . .
का गं. . .?
ईतके का केलेस गं माझ्यासाठी?
पण केवळ एकच खंत आहे मी मात्र तुझ्यासाठी काहीच करु शकलो नाही गं. . .
तुला माझ्याकडून काहिच आनंद देऊ शकलो नाही मी. . .
पण. . .
पण आज वचन देतो मी तुला, " तूझ्याही प्रत्येक अश्रुसाठी लढेन मी. . . ,
देवाशीपण झगडेन
पण तुझ्या आयुष्यातही सुख आणेन मी,
केवळ याच नाही तर प्रत्येक जन्मात तूझा खरा सोबती असेन मी. . ."
No comments:
Post a Comment