फुलावर बागडणाऱ्या भ्रमराच्या
तन्मयतेन स्वतः रमून जाणार शांत
आयुष्य जगत होते…
का हि अनामिक बेचेनी निर्माण झाली ?
संथ पाण्यावर तरंग उठावेत जसे ?
माझ्याच कोशातून मी बाहेर आलेय
पुनर्जन्मच जणू ..!
खूप दिवसापासून शोधत असलेल
काहीतरी गवसलंय मला ..
आता मी प्रत्येक क्षण जिज्ञासेन जगते
प्रत्येक क्षणाचा आनंद थेंबाथेंबाने
जपून ठेवते ..
हा बदल तुझ्यामुळेच ..
माझ्या एकटीच्या विश्वात किती
आलवारपणे पाउल टाकलेस ..
खूप प्रयत्न केला मनाला आवरण्याचा
ते मात्र तुझ्यापाशीच भिरभिरत राहत..
कधी वाटत सांगून टाकावं
सगळ तुला ..
पण तू समोर आल्यावर मात्र
शब्दच मुके होतात …
पहिल्यांदाच हा प्रवास अनुभवलाय,
माझ्या मनापासून सुरु होणारा
आणि तुझ्याच मनापाशी थांबणारा …
मला विश्वास आहे ,
माझ्या मनात छेडलेल्या
सप्तसुरांच्या तारा..
तुझ्या मनात नक्कीच झकारतील ..
source www.bestcoolquotes.com
No comments:
Post a Comment