कोवळ्या किरणातील कोवळ इंद्रधनू होऊनी
श्रावणातील मधुर सकाळ आली.
सुमनानवरचे टपोर दवबिंदू कोवळ्या उन्हात
मोत्यांसम चमकवून गेली.
मोहमयी सकाळी नाजूक तुझ्या आठवणीत हिंडावे
लाडीकपणे त्या आठवणींशी मी उगीचच भांडावे.
गर्द निळ्या अंधाराचे पाश सारुनी
कुशीत पहाटेच्या रात्र हि निजली.
पतंगाने झेपावातच ज्योतीवर
निळी किनार असणारी ज्योत विझली.
सरीतांच्या लहरीवर तरंग उठताना
गोड सूर छेडण्याचा होणारा भास,
अथांग निळ्या सागरात उसळनार्या लाटेला
जशी लागते किनार्याची आस.
सौख्यादायी वातावरणात प्राण्याच गीत फुलत
विरहाच दुख हृदयामध्ये जस कायमस्वरूपी सलत
........मनापासून
२३/६/२०१०
source: http://manapasunfakttuzasathi.blogspot.com
No comments:
Post a Comment