Thursday, September 29, 2011

ती

ती खळखळून हसते आणि मला आनंद होतो,
ती हलकेच लाजते आणि मी लालबुंद होतो,
ती कधी अबोल होते ,
मी मात्र तिच्या एका-एका शब्दाची वाट पाहतो.
ती माझ्यासोबत असते,
आणि मी हे विश्वच विसरून जातो.
अन ती नसताना ती असल्याचा भास होतो,
नयन शोधतात तिला अन मन व्याकुळ होत.

No comments:

Post a Comment