Monday, September 12, 2011

'तू' जवळ आलीस तेव्हा

घन हे सारे दाटुन आले
'तु' जवळ आलीस तेव्हा
मेघ हे बरसुन गेले
'तू' जवळ आलीस तेव्हा

भाव डोळ्यातून वाहले

'तू' जवळ आलीस तेव्हा
शब्द ओठातच राहले
'तू' जवळ आलीस तेव्हा

स्पंदनाचे नाद ऐकू आले

'तू' जवळ आलीस तेव्हा
दोन जीव एक झाले
'तू' जवळ आलीस तेव्हा

नजरेला बहर आला

'तू' जवळ आलीस तेव्हा
प्रणयाचा कहर झाला

मनापासून

No comments:

Post a Comment