Wednesday, September 28, 2011

आज अचानक दैव कसं माझ्यावर बलवत्तर झालं

सकाळी बसमध्ये झालेल्या नाट्यमय अपघातावर सहज केलेलं मनोगत, आशा आहे तुम्हालाही ते आवडेलं.....:D

"आज अचानक दैव कसं माझ्यावर बलवत्तर झालं,
बसमध्ये चढल्या सुंदरीशी थोडक्यात भेटवून गेलं!!

गर्दीमधून वाट काढत निघाली जसा जवळ आला Stop ,
बट सारत मुखड्यावरची सळसळत नागीण Non - Stop !!

नजर पडली अवचित...नजरानजर झाली, झाला गोड अपघात,
माझ्या Bag च्या चेनला अडकून ओढणीने तिच्या केला घात!!

ताणली जशी ओढणी वळून बघितलं......आहा....नजाकत,
धरून हातात भरजरी ओढणी दिली खल्लास Smile लाजत!!

व्यर्थ गेला सोडविण्याचा तिचा मिनिट भराचा खटाटोप,
सर्वांच्या मिश्कील नजरेतून होत होते Dramatic आरोप!!

हसती तिची नजर मात्र खिळली होती माझ्यावरचं जराशी,
जेव्हा तिची मैत्रीण खेळायला लागली चेन आणि ओढणीशी!!

शेवटी न राहवून मीचं केला प्रयत्न सोडविण्याचा तो गुंता,
मलाही जमेना शेवटी तिच्या मधुर आवाजानेचं भंगली शांतता!!

Plz ....तोडा आता ते धागे मला कॉलेजला खूपचं झालंय लेट,
चेहऱ्यावरचे अगतिक भाव पाहून तिच्या मीही मग तोडले थेट!!

हसत गेली पुढे निघून मिळाला उतरतानाचा एक ओझरता कटाक्ष,
आधीचं सुखावलेल्या चातक मनावर Sollid मोरपिसं फिरली लक्ष!!

खटकन तुटले सखे ते खट्याळ धागे तुझ्या भरजरी ओढणीचे,
पण भास आभासात नकळत कुठेतरी जुळले धागे दोन मनांचे!!

सांग सालस हरिणी परत अशीचं मुद्दामहून कधी भेटशील का??
Bag ला नाही आता माझ्या अधीर दिलालाचं अडकशील का??

No comments:

Post a Comment