Wednesday, September 28, 2011

या जगात सगळच , बाहेरून सुंदर दिसत.....

या जगात सगळच , बाहेरून
सुंदर दिसत.....
प्रत्यक्षात मात्र
गुणी ,फारच थोड असत....
सुंदर आणि गुणी अस , जगात
एकच असत....
ते म्हणजे सुंदर , गुलाबाच फुल
असत....
काट्यावर उभ राहूनही, सतत
सारख हसत असत....
दुसर्याच्या आनंदासाठी , खुप
खुप फुलत असत....
निस्वार्थी निरागस अस ,
मोहक त्याच रूप असत....
'प्रेम ' व्यक्त करताना ,
म्हणुनच ते प्रतिक असत....
सर्वांमध्ये त्याला , राजाच
स्थान असत....
म्हणुनच डौलात ते ,
वार्यावरती डोलत असत....
जितक सुंदर जितक मोहक ,
तितकच ते खट्याळ असत....
काट्याशिवाय हाताला ,
सहज अस लाभत नसत....
देवाच्या देव्हारयात
त्याला , मानाच स्थान
असत....
आपल्याजवळ असत तेंव्हा ,
आपला ते मान राखत....
एक दिवसाच्या आयुष्यात ,
खुप काही शिकवून जात....
स्वत: काहीच न घेता , खुप
काही देउन जात!!!! :)

No comments:

Post a Comment