Thursday, September 29, 2011

मग क्षणात फुल ते.. लागले सुंदर हसू

चाललो होतो असाच एकदा
पाठून दिला कुणीतरी आवाज
दादा एक रुपया तरी दे आज............

मागे वळून पाहता
... पसरले होते हात चिमुकले
कोमेजलेला चेहरा आणिक
डोळ्यातील पाणी सुकलेले ..................

चेहऱ्यावरील भाव बोलती
काहीतरी दे
याचना करतो तुजपाशी
माझ्या सकट आज माझी
भावंडे आहेत उपाशी.................

बापास दारूचा संग
त्यास आठवते ना घरदार
आई अंथरुणाला खिळलेली
पडली आहे कायमची बिमार.............

असा मोडलेला घराचा कणा
घरी नसे एकही दाणा
सगेसोयरे करतात हडहड
असह्य होते भुकेसाठी धडपड..................

सांगायलाही नाही वेळ
ही करुण कहाणी
डोळे ही थकले आता
गाळून सारखे पाणी.................

पाहून नयनांत त्या
पीळवटले माझे आतडे
सहज हात गेला खिशाकडे
काढून दिले थोडे रोकडे..................

मग क्षणात फुल ते
लागले सुंदर हसू
पाहून निरागस हास्य ते
नयनांत माझ्या चमकले
अलगद दोन आसू.................

No comments:

Post a Comment