पानावरच्या दवबिंदूपरी....
आयुष्य आता जगणे आहे
उद्याची न असे शाश्वती
प्रत्येक क्षण हरणे आहे
पानावरच्या दवबिंदूचे
असणे तरी का असणे आहे ?
घटकाभर असे स्थिरावणे
मग मातीत ओघळणे आहे
पानावरच्या दवबिंदुला
परवानगी ना आकांक्षांची
सप्तरंगात कधी न्हाणे
कधी पायदळी येणे आहे
पानावरच्या दव बिंन्दुसम
जगण्याची लालसाही वाटे
पहाट गारवा हवाहवासा
उन्हाशी ना झगडणे आहे
पानावरच्या दवबिंदूचे
असणे तरी का असणे आहे ?
घटकाभर असे स्थिरावणे
मग मातीत ओघळणे आहे
पानावरच्या दवबिंदुला
परवानगी ना आकांक्षांची
सप्तरंगात कधी न्हाणे
कधी पायदळी येणे आहे
पानावरच्या दव बिंन्दुसम
जगण्याची लालसाही वाटे
पहाट गारवा हवाहवासा
उन्हाशी ना झगडणे आहे
No comments:
Post a Comment