( पार्श्वभूमी )
मी जेंव्हा गृहसंकुलात रहावयास आलो तेंव्हा एका इमारतीचे बांधकाम चालू होते.खूप कामगार कामावर होते. या कामगारात एकाने माझे लक्ष वेधून घेतले होते. तो मजूर जवळ जवळ ७० वर्षाचा असावा. त्याची पत्नी पण कामावर येत होती. विशेष म्हणजे या जोडप्याच्या चेहर्यावर नेहमी हसू असायचे. त्यांना उद्याची चिंता नसेल का? ज्या दिवशी वार्धक्याने थकून काम बंद होईल त्याच दिवशी त्याची उपासमार पण सुरू होईल हे एक भयानक सत्त्य त्या दोघांना दिसत नसेल का? वयाच्या सत्तराव्या वर्षी पोट भरण्यासाठी दिवसभर राबावे लागते. असे असूनही वागण्यात कोठेही आणि कधीही उदासी नव्हती.
माझे विचार चक्र सुरू झाले. आम्हा व्हाइट कॉलर्ड लोकांना पेन्शन मिळते; तरीही आपण नेहमी रडत असतो. शॉवरला पाणी आले नाही तरी आपण दु:खी काष्टी होतो. केवढी ही तफावत आपल्या आणि त्या मजुराच्या जीवनाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात ! जसा जसा मी विचार करू लागलो तसा तसा मी स्व्तःला क्षूद्र भासू लागलो. या विचारमंथनातून त्या कलंदर मजूरावर तयार झालेली ही गजलः--
मी कलंदर आसवांची रात्र करतो साजरी
सांजवेळी सुरकुत्यांशी खेळतो अंताक्षरी
खूप कष्टाने कमवली पोट भरण्या भाकरी
जन्म सारा फक्त केली मी भुकेची चाकरी
घे परिक्षा, देतजा तू यातना नानापरी
मी कधी म्हणणार नाही पाव रे तू श्रीहरी
रंगली रंगात माझ्या मस्त माझी बावरी
लक्तरामध्येच सजली; नेसली ना भरजरी
देत आली गारवा ती वाळवंटी चालता
व्यक्त करण्या ॠण सखीचे रोज लिहितो डायरी
एक दूज्यावीन जगणे कल्पना करवेचना
शक्यतो दोघास देवा एकदम नेरे वरी
मी वसंताचे, फुलांचे गीत रचले ना कधी
लेखणीतुन फक्त झरते वेदनांची शायरी
घेतली ना नोंद कोणी खंत याची का सखे?
सांग जनगणना कधी का होत असते सागरी?
नेत्र का "निशिकांत" थिजले? चेतना गेली कुठे?
फुंक गेली, सूर विरला, फक्त उरली बासरी
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

ReplyDeleteजन्म सारा फक्त केली मी भुकेची चाकरी
Thanks Sandip for response.
ReplyDelete