Friday, November 16, 2012

मला तुझ्याशिवाय जगावसं वाटत नाही..

का जगतेय मी तुझ्याशिवाय,
खरचं हे मनाला पटत नाही..
तुला सोडून जगावं मी,
मनात असा विचार कधीचं येत नाही..
तु माझी जिवलग होतास,
मी मात्र तुझी कोणीचं लागत नाही..
खरचं खुप जिवापाड प्रेम करते रे तुझ्यावर,
हे अजुन तुला कसे कळत नाही..
क्षण-क्षण तुटतो रे तुझ्यासाठी जीव माझा,
तुला माझी थोडीही काळजी वाटत नाही..
दिवस-रात्र मरते रे तुझ्यासाठी,
असा एकही क्षण नाही ज्या क्षणी मी रडत नाही..
सारखा तळमळतो रे जीव माझा तुझ्यासाठी,
का रे तुला मला एकदाही भेटावसं वाटत नाही..
डोळे नेहमी ओले होतात माझे तुझ्या आठवणीत,
त्यांनाही तुझ्यासाठी रडल्याशिवाय चैनचं पडतनाही..
खरचं रे खुप मन रडते माझे तुझ्यासाठी,
कारण ?????
मला तुझ्याशिवाय जगावसं वाटत नाही..
_
ashwin maske

No comments:

Post a Comment