Friday, November 9, 2012

पुण्य वाकले

सत्तेवरती पाप बैसले
सलाम करण्या पुण्य वाकले

कोल्हे कुत्रे रस्तोरस्ती
वाघ सिंह का कमी जाहले?

पोवाडे मी लिहू कुणावर?
शौर्य कालचे लुप्त जाहले

भ्रुणहत्त्येच्या सुपारीस का
डॉक्टरची फी म्हणू लागले?

आज तिला सुखरूप वाटते
वार्धक्याचे कवच लाभले

सन्याशांच्या भगव्या खाली
क्षुद्र पशूंनी स्वार्थ साधले

नोटांवरती सदैव हसती
गांधींनीही दु:ख झाकले

गमक यशाचे नवीन झाले
कुणी कुणाचे पाय खेचले

"निशिकांता"ने धवल बघाया
इतिहासाचे पान चाळले


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com



No comments:

Post a Comment