Wednesday, November 21, 2012

तुझ्यापेक्षा तुझी आठवणचं बरी.....

तुझ्यापेक्षा तुझी आठवणचं बरी..
अगदी पाहिजे तेंव्हा येते,
अगदी पाहिजे तशी येते..
आणि हो...अगदी वेळेत येते..

तुझ्यापेक्षा तुझी आठवणचं बरी..
मनाला खोलवर रिझवते,
तनाला हळुवार भुलवते,
आणि हो...क्षणाला क्षण क्षण झुलवते..

तुझ्यापेक्षा तुझी आठवणचं बरी..
एकांतात सोबत देते,
गर्दीत एकांत देते,
आणि हो...दु:खात सुखांत देते..

तुझ्यापेक्षा तुझी आठवणचं बरी..
तु सहज सोडून जाते,
ती सतत माझ्यासंगे रहाते,
आणि हो...तुझी सवत म्हणून मिरवते ..

तुझ्यापेक्षा तुझी आठवणचं बरी..
तु कधी दु:खी करते,
ती नेहमीच सुखी करते,
आणि हो...येताजाता वाचा मुकी करते..

--श्रीनिवास गुजर
०९८२३० ५६३५३

No comments:

Post a Comment