पाहून गोड हसली मला
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhtIen4O9Mn2_hR9N1BraJOM4l429IV09TAN6a7eCgf-RR9bPc56qw1NFCKJZfMmWUJe-KMR1NdYGorabTlbjjuKlpqyP_ue1QTqCF9aUAu_sW22LVx_cm2TQDwt4YIGFejXDtKghjXCXI/s320/madhuri-dixit-729879.jpg)
कालचं ती दिसली मला
पाहून गोड हसली मला
मी मात्र हसलो नाही
तिच्याशी काहीच बोललो नाही
...
ती मात्र बोलत होती
मी काहीतरी बोलेल याची वाट पाहत होती
खूप काही आठवत होते
डोळे चिम्ब भिजले होते
अश्रू काही पडत नव्हते
पण मनात तलाव साठत होता
काही शब्दच फुटत नव्हते
काय बोलावे काही समजत नव्हते
तयार होती ती कुठेतरी जाण्यासाठी
मनात बोलतं होतो मी थाब ना गं माझ्यासाठी
असा मनात विचार आला म्हणून स्वःतावरचं चिडत होतो
आम्ही आता एकत्र नाही हेचं मी विसरलो होतो
बघता बघता गेली ती निघून
पुन्हा गेल्या त्या जखमा भिरून
बरं झालं असतं ती दिसलीच नसती
मला पाहून हसलीचं नसती........................
No comments:
Post a Comment