Wednesday, October 19, 2011

कावते का बायको

बोलता बोलता शेजारणीशी कावते का बायको
सारखी मागील खिडकी लावते का बायको
माप ओलांडून आली काल दारातून ज्या
आज त्या दारात सांगा मावते का बायको


लग्न केले पाहुनीया गाय गोठ्यातील
आज शिंगे रोज मजला दावते का बायको
सोबतीला टंच तरण्या मॉड बहिणी सोडूनी
खाष्ट आईला सदा बोलावते का बायको


बोलतो,रागाविली की देखणी दिसतेस तू
हे खरे मानुनिया-रागावते का बायको ?
भांडते माझ्यासाठी या बिपाशी - माधुरी
गोड त्या स्वप्नातही डोकावते का बायको


स्मार्ट पी.ए.मी नव्याने नेमलीले पाहुनी
रोज प्रश्नांनी नव्या भंडवते का बायको
ज्येष्ठ्तेने वाढते का हो खुमारी त्यातली (?)
ती अशी आहे तरी लोभावते का बायको


खास ती शो-केसमधील सिल्क साडी आणली
पाहुया तरी आज रात्री पावते का बायको

No comments:

Post a Comment