Wednesday, October 12, 2011

ऑफिस

आकाशीच्या ऑफिसात
आहेत ऑफिसर दोन
दिवसपाळी करतो सूर्य
रात्रपाळीला आहे चंद्र
देतात दोघेही प्रकाश छान
तरी चंद्राला भलताच मान ||
सहस्त्र कराने अपुल्या
सूर्य करतो एकटाच काम
दिमतीला मात्र चंद्राच्या
आहेत नोकर तमाम ||
सूर्याची अन कामाची असते सदैव गट्टी
चंद्राला मात्र महिन्यातून मिळते एकदा सुट्टी ||
आहे माझ्या मनात एकच मोठी शंका
निरसन सांगा तिचे चटकन तुम्ही कराल कां ? ||
अमावस्येला ऑफिस असावे एकदम बंद
म्हणून केला होता कां चंद्राने कधी संप ? |

-
अज्ञात कवी

No comments:

Post a Comment