मेल्या संवेदना

मेल्या संवेदना
आता ना वेदना
थकल्या मनाला
जागवितात अन्ना
निति नियम धाब्यावर
भ्रष्टाचार राजधर्म
रामबाण लोकपाल
थकलेल्या मना
रोजची लढाई
रोजचा झगडा
गांजलेल्या रयतेला
मसीहा अन्ना
हाता तोंडाची
पड़े ना गाठ
वर्षे स्वातंत्र्याला
उलटली साठ
गोरयांची गुलामी
काल्यांची मगरुरी
अन्ना अटकेत
दाउद फरारी
No comments:
Post a Comment