Wednesday, October 19, 2011

हात तुझे माझ्या हातात असावे...

हात तुझे माझ्या हातात असावे...
घेवून तुझे हात हातात दुरवर चालावे...

हातांनीच तुझ्या माझ्याशी बोलावे...
हातांनीच मग माझ्या उत्तर तुला द्यावे...

हातानेच तुला जवळ घ्यावे...
दूर तू मला हातानेच ढकलावे...

हाताला माझ्या अनेक प्रश्न पडावे...
की हाताने तुझ्या असे का वागावे?..

मी परत तुझ्या हातपाय पडावे...
मग हात तू हातात देवून मला फुलवावे...

यावे मनात की, हात तुझा पकडून पळून जावे...
पण हात हातात गुंफून तू मला थांबवावे...

तुझ्या घरच्यांनी मग हात धुवून मागे लागावे..
दोनाचे चार हात तुझे, करायचे ठरवावे..
तू मला मग हातानेच जवळ बोलवावे..
माझ्या हातांशी करत चाळा खूप रडावे...
वाटे तेव्हा आपल्या हातांना हजारो हात आणखी फुटावे..

आता वाचकांनाही असेच काहीतरी वाटावे...
की हातांनीच त्याच माझा गळा दाबावे...

No comments:

Post a Comment