Saturday, October 8, 2011

@गुलाबाचेरहस्य@


आज तिच्या प्रत्येक शब्दात राज दिसत होता. राज असा आहे...राज तसा आहे... किती वेळ मी नुसता तिच्या बघत होतो. तिचा आज वाढदिवस होता, पण माझा खिसा तर खाली होता. पण तिला काहीतरी द्यावे म्हणुन 10 रुपयाचे गुलाब तिच्या हातावर ठेवले. नेमका तिचा चेहरा ओसरला. चेहऱ्‍यावर कसला आनंद नाही, एक हसु पण तिच्या चेहऱ्‍यावर उमटले नाही. मला लगेच कळले,पण मी काही बोललो नाही. तेव्हा मला तिचा गेल्यावर्षीचा वाढदिवस आठवला. एवढा पाऊस पडत असताना सुद्धा तिने मला बोलवले," आज माझा वाढदिवस आहे, तु ये भेटायला". मी नकार तर देऊ शकलो नाही आणि पळतच गेलो. जाताना गुलाब विकत घेतला. तिथे ती उभी होती, संपुर्ण ओलींचिँब झालेली..

तिला भेटेपर्यँत गुलाबाच्या तीन चार पाकळ्याच राहिलेल्या हातात...तरीही तिने ते मनापासुन स्विकारले. पण चेहऱ्‍यावर ते भाव आणु दिले नाहित..
m sorry...मी तुम्हांला राज बद्दल सांगितलेच नाही. राज तिचा मित्र आहे. कामावर असताना दोघांची ओळख झाली.. तसा राज खुप श्रीमंत!!! प्रियंका(काल्पनिक नाव) ला पण चांगलाच पगार होता, पण माझी हालत तर खुप वाईट होती. मी एका ठिकाणी दरमहा 3000rs पगारावर घर चालवत होतो. काम करता करता माझे शिक्षण पण चालु होते.
खुप दिवस झाले, तिचा कॉल आला नाहि, मेसेज आला नाही. कॉल केला तर म्हणे," मी BUSY आहे, आपण नंतर बोलु, BYE." रोज असेच चालु राहिले. . एकदा रस्त्यावरुन जाताना तिची मैत्रीण भेटली, थोडं तिच्याशी बोलल्यानंतर जाताना ती म्हणाली," OK. BYE..SORRY," मी बोललो,"sorry कश्याबद्दल?" ती म्हणाली," तुमच ब्रेकअप झालं ना त्या बद्दल वाईट वाटतयं."
.
माझ्यावर आभाळ कोसळावं एवढा मोठा मनावर आघात झाला. खुप रडावं असं वाटत होतं पण आपले रडणे कोणालाच ऐकु येणार नाही, आपणच स्वतःला सावरु शकतो हा विचार आला आणि मनाला शांत केलं. उद्यापासुन नवीन जीवन जगायचं हा निर्धार मनाशी पक्का केला.मी एका मोबाईलच्या दुकानात काम करायला लागलो. अशाच एक दिवशी रात्री 8 वाजता दुकानात असताना एक मुलगा आणि एक मुलीने दुकानात प्रवेश केला, आणि मला खुप मोठा धक्का बसला, पोटात भीतीने गोळा येईल अशी अवस्था झाली. ती प्रियंका होती....!!! माझ्यासमोर सगळे क्षण पुन्हा उभे राहिले.. तीची नजर चुकवत मी लपणार तोच मालकाने आवाज दिला," ह्यांना मोबाईल दाखव." माझी हालत खुप वाईट झाली, तरी सुद्दा मालकाची आज्ञा पाळणे गरजेचे होते.
.
तिची नजर माझ्याकडे गेली. तिला सुद्धा तसंच झालं असणार हे माहित होते. तिच्याबरोबर असलेला तो मुलगा म्हणाला," आम्हांला एक चांगला मोबाईल दाखवा. आमचं बजेट 20000rs आहे." मी मोबाईल दाखवत होतो, तिच्या हातात देत म्हणाला," हे घे तुझी वाढदिवसाची भेट." तेव्हा मला समजले आज तिचा वाढदिवस आहे. आणि तो मुलगा तिचा BF राज होता... एवढ्या वेळ मी तिच्याकडे बघितले सुद्धा नाही पण ती जात असताना मी बोललो," HAPPY BIRTHDAY MAM..." तिने फक्त एक क्षण माझ्याकडे बघितले आणि निघुन गेली.
.
"खरचं, राज तिच्यासाठी बनला आहे..तिला तो नेहमी खुश ठेवेल. आज तिचा B'DAY होता तर त्याने तिच्यासाठी वीस हजार रुपये खर्च केले...नाहीतर मी...दहा रुपयाचा गुलाब द्यायचो..खरचं, मी तिच्या प्रेमाच्या लायकीचा नाही आहे..." माझ्या चांगल्या मार्क्स मुळे मला एका foreign company कडुन जॉबसाठी ऑफर आली,
काही वर्षानंतर मी पुन्हा भारतात परतलो.. ती खुश होईल का मला बघुन? की पुन्हा दुःखी होईल? एकदाचा पोहचलो तिच्या घरी. काहिसा थांबलो निशब्द. दिर्घ श्वास सोडला आणि घराची बेल वाजवली. दरवाजा उघडला गेला. एकाने बाईने दरवाजा उघडला. मी आश्चर्यचकीत झालो. तिला प्रियंकाच्या कुटुंबा बद्दल विचारले. तेव्हा कळले की ते कधीचेच घर सोडुन गेले येथुन... त्यांचा नवीन पत्ता माहित नव्हता.
.
मी खुप दुःखी झालो. जवळच एका गणपती बाप्पाच्या मंदिरात बसलो. "हे बाप्पा, मला फक्त तिची भेट घडव. यानंतर तुझ्याकडे कधी काही नाही मागणार!" तेवढ्यात मला तिची ती जुनी मैत्रीण दिसली, तिला प्रियंका बद्दल विचारले. तिने सांगितले की, "ती खुप बदलली आहे. आता ती कोणाशीच बोलत नाही. राजने तिला सोडुन दिले. खुप रडत होती.." माझे काळीज नुसते तुटत चालले होते.तिच्या मैत्रिणिने माझी ओळख करुन दिल्यावर ती स्तब्ध झाली,
.
मी:" कशी आहेस?"
प्रियंका:" मी बरी आहे. तु कसा आहे?"
मी:" मी सुध्दा बरा आहे. बरीच वर्ष तुला भेटलो नाही म्हणुन विचार केला आज भेटुन घ्यावे"
प्रियंका:"मला पण...."
तिच्या डोळ्यांतुन अश्रु वाहु लागले. मी खांद्यावर हात ठेवुन तिला आधार देणार तेवढ्यात तिने माझा हात झटकला.
ती रडत रडत म्हणाली," तु एक नंबरचा खोटारडा आहे."
मी:"काय?? मी तुला काय खोट बोललो"
प्रियंका: "तु मला वचन दिलेले की तु मला कधीच सोडुन जाणार नाही, जेव्हा पण मला तुझी गरज असेल तर तु माझ्यासाठी धावुन येशील...पण तु वचन मोडलेस..."
मला काय बोलावे तेच कळेना.. मी म्हणालो," SORRY..पण तुच तर BREAKUP केला होता ना?"
प्रियंका:" हो माहीत आहे. पण मी मुर्ख होती, पण तु तर नव्हता ना...मला तुझी खुप गरज होती..I AM SORRY..."
मला तिचा राग सुद्धा येत होता आणि हसु सुद्धा...
मी तिला घट्ट मिठी मारली. तरी तिचे रडणे सुरुच होते...
मी म्हणालो," तु कधीच सुधारणार नाही, स्वतःची चुकी असली तरी माझ्यावर ढकलणार...तरी मी तुझ्यावर खुप प्रेम करतो."
तिला खुप आनंद झाला. मी क्षणाचाही वेळ न दवडता एका गुडघ्यावर बसुन लग्नाची मागणी घातली. ती खुप लाजली...तिने होकार दिला.
आज मला जग जिंकल्यासारखं वाटु लागलं. जीवन खुप सुंदर असल्याचा साक्षाक्तार झाला. मी तिला एक सोन्याचा हार गिफ्ट केला पण तिने तो नाकारला..तिला फक्त माझ्याकडुन एक गुलाब पाहिजे होता...तिला त्या गुलाबातले रहस्य कळले...आणि मला कळले की," जर तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करत आहात पण ती व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत नसेल तर निराश होऊ नका.

No comments:

Post a Comment