अधुरी हि प्रेमकहाणी
आज मी सांगणार आहे एक कहाणी
त्या कहाणी मध्ये आहे आकाश आणि धरणी
वाटे होते त्यांचे मिलन
क्षितिजावरती
धरणी सुद्धा जगते याच
आभासावारती
गवसणी घालण्यासाठी
त्या आकशाला
पोळते स्वतःच
आकाश हि मग
टाकतो प्रेमाचे थेंब
त्या पावसाच्या रुपात
आकाश तून पडलेल्या पावसाचा
तेवढाच काय धरणीला दिलासा
हाच आकाशाचा स्पर्श
वाटे हवाहवासा
निर्सागातील पंच महाभूते मधील
हे दोघे
एकमेकांसाठी आतुर झालेले
हे दोघे
तृप्त पावसाचे पिऊन थेंब
होते ती धरणी
समाधानी
आकशा सांगे त्या धरणीला
परत येईल तुला भिजवायला
साठवून घे प्रत्येक थांब
तुझ्या हृदयात
परत भेट तेवाच होईल
जेव्हा मेघ बरसेल नभात
आस लावूनिवत बघे धरणी
मनाला चटका लावून जाणारी
अधुरी हि प्रेमकहाणी
अधुरी हि प्रेमकहाणी
No comments:
Post a Comment