Wednesday, October 19, 2011

मॉल मधे भेटली एक मुलगी ख़ास

मॉल मधे भेटली एक मुलगी ख़ास
घेत होती जीन्स आणि टॉप....!
एक टॉप तिने उचलला
कसा दिसतो म्हणून बघितला....!
सहजच नजर माझ्यावर गेली
मी हिम्मत करुन नकारार्थी मान हलवली...!
नाक मुरडतच तिने टॉप खाली ठेवला
आगवच आहे म्हणून शेरा मारला.....!
परत टॉप उचलत तिने नजरेने माझा वेध घेतला
मी ठीक ठाक आहे असा टोला परतावला....!
हसू आणत परत तिने तीसरा try केला
मी शोभतो असा अभिप्राय दिला ....!
मला आवडला म्हणून तिने तो टॉप खरेदी केला
तेव्हा क़ळाले कुठे का होईना साली किंमत आहे आपल्याला...!
कोण होती , का केले असे तिने या उत्तरात सगले आयुष्य सरेल
एक मात्र खरे माझा पसंतीचा टॉप घालून ती नक्कीच फिरेल ....!

No comments:

Post a Comment