Wednesday, August 3, 2011

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे

वरती खाली इन्द्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधिले नभोमण्डपी कुणि भासे

झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा तो उघडे
तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळेपिवळे ऊन पडे
वरती खाली जलदांवरती…

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

No comments:

Post a Comment