Thursday, August 4, 2011

आज खुप एकट-एकट वाटतय


आज खुप एकट-एकट वाटतय,
जणु तुला शोधावस वाटतय,
नज़रेतुन तुला बघावस वाटतय,
मनातून थोडस रडावसही वाटतय…..

चिंब पावसात भिजावस वाटतय,
तुझ्या हाताला धरून नाचावस वाटतय,
ओल्या डोळ्यांनी तुला पहावस वाटतय,
पहाता-पहाता तुला सर्व काही सांगावस वाटतय…..

भिजल्या अंगानी तुला मिठीत घ्यावस वाटतय,
गार पडलेल्या अंगाला थोड गरम करावस वाटतय,
बेभान वारयाबरोबर धावावस वाटतय,
जगाला विसरून वेगळ काही कारावस वाटतय…..

पण....
सर्व काही नुसत वाटतच रहातय,
नसून सुद्धा ह्या इथे, तू असल्यासारखी वाटतेस ,
तुझ्याशिवाय मन जणु वेड होऊन रहातय,
हळव्या मनाला कुठेतरी समजवावस वाटतय…..

No comments:

Post a Comment