Wednesday, August 3, 2011

येणार्‍या सर्व आव्हांनासाठी सज्ज


मानलेल्याना नात्याला ही पळवाट नेहमीच असते...त्यासाठीच ते  पकडून ठेवायचे असते......नात असण्यात आणि मानण्यात जमीन आसमानाचा फरक असतो....असलेल नात जड़ झाल तरी माणूस झिडकारू शकत नाही नाकारू शकत नाही...... मनातून उतरलेल्या व्यक्तिशी कोणतही नात ठेऊ नका........ अस नात फक्त त्रास देत......पण मनाने जोडलेल्या नात्याला कधीही अंतर देवू नका......... कारण ते हृदयात बसलेले असते "  

 

                       " एकवार आपण कर्ज मानल, की ते देण माणसाच कर्तव्य आहे..... नाहीतर आपल्याला ते मनात मिंदय करत...... मनात दास्य निर्माण करत ......शून्यातने मिळालेला शेवटचा रुपया ही जुगारात लावायला आवडेल...... कारण मी शुन्यातून विश्व निर्माण करू शकतो...... मग त्या रुपयातून का नाही पण हें सगळे चांगल्यासाठी .... तसं देवाने मला चांगलच "बनवल" आहे  मी देव मानतो... पण मी प्रयत्नवादी आहे. "

                 

                       "ज्याला आपली मत मांडता येत नाही त्याला मत असून नसून सारखीच!!! आपली मत मांडण्यापेक्षा दुसर्याला पटणारे विचार बोलायचे.... मग विषय संपतो ...विश्वासघात फक्त विश्वासू व्यक्तीच करू शकते..... स्वत:च्या अस्तित्वावर बेतल की, या जगात कोणी कोणाच नसत ....एक माणूस म्हणून तुम्हाला सगळे गुन्हे माफ़.... पण माणूस असाल तर..."

 

                      " वादळ कधी परवानगीची वाट पाहत दारावर थांबत का?.... संसारात आपण कोणत्या व्यक्तिबरोबर संसार करतो आहे तिला महत्त्व द्यायला हव... संसाराला नाही...... श्रद्घा प्रेम शिकवते आणि अंधश्रद्धा फक्त बळी मागते...... "निसर्गाला रंग हवा असतो, फुलानाही गंध हवा असतो, माणूस हा एकटा राहणार कसा, कारण त्यालाही मैत्रीचा छंद हवा असतो !!!!!" ....पण फसवणाऱ्या  व्यक्तिसाठी माझ्या आयुष्यात स्थान नाही....... सोय पाहून केला जातो तो व्यवहार आणि गैरसोयीतही सोय पहिली जाते ते प्रेम .....हिशोब कळतो पण किम्मत कळत नाही"

 

                     " मला गाने  म्हणायला ~~~ आवडत..... पण मी गाने  म्हटलेल लोकांना आवडत नाही.... मला प्राणी आवडतात पण त्याना कैद करण आवडत नाही.....प्रत्येकाला स्वातंत्र्य दिल जाव.... कारण पकडून पकडून मैत्री करायाला आवडत नाही..... पण मैत्री केल्यावर पकडून ठेवायला आवडत "

                       " जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत लढाईचा शेवट होण शक्यच नाही....आयुष्यातली प्रत्येक लढाई जिंकली नसेन कदाचित.... पण लढली जरुर आहे  ...  "या जन्मावर.. या जगण्यावर शतदा प्रेम करावे...!!" आणि हेच जगणे आनंदी करणारी काही नाती माझ्या आयुष्यात महत्वाची आहेत. आयुष्यातील चांगुलपणावर विश्वास. खोटेपणा, वाईट वृत्ती, माणंस यांचा तिरस्कार..!! नशीबावर विश्वास नाही.....आयुष्य तुम्हाला ज्या मार्गाने नेत असेल त्या मार्गाने जाऊ नका. तर तुम्हाला ज्या मार्गाने जायचे असेल त्या मार्गाने आयुष्याला न्या "

 

                      " मी कधीच कोणती गोष्ट अर्धवट सोडत नाही..... चांगल किंवा वाईट झाल तरी त्याच खर कारण शोधून काढतो..... मी माझा कोणताच निर्णय नियतिवर सोडत नाही........ मला आयुष्यात जगताना धेय्य, तत्वांशी तडजोड मान्यच नाही...... कारण पर्याय ठेवून जगणारा मी नव्हे."

 

                      "येणार्‍या सर्व आव्हांनासाठी सज्ज

No comments:

Post a Comment