ढाक्कु-माक्कूम ढाक्कु-माक्कूम ढाक्कु-माक्कूम
गोविंदा रे गोपाळा
गोविंदा आला रे आला
गोविंदा ! गोविंदा ! गोविंदा
वाकड्या गल्लीचा नाक्यावरचा
आला नाचत गोविंदा
ओतून पाणी करूया स्वागत
नाचूया ताता ता थैया
गोविंदा आला रे आला
ताई माई बघा
आम्ही जमलोय सारे
दही दूधाची होऊ दया
धमाल बरसात रे
गोविंदा आला रे आला
मोरपिस रोवतो फेट्यात
छोटा मुकूंद बाळा
हंडी फोडायचा त्याला
बघा लागलाय चाळा
गोविंदा आला रे आला
थरावर थर चढती सरसर
सजल्या हंडीवर गोविंदाची नजर
गार गार पाण्याने वाजतेय थंडी
एक दोन तीन चार फुटली बघा दहीहंडी
गोविंदा आला रे आला
अरे एक दोन तीन चार
वाकड्या गल्लीची पोरं हूशार
गोविंदा आला रे आला
ढाक्कु-माक्कूम ढाक्कु-माक्कूम ढाक्कु-माक्कूम
- देवनिनाद
No comments:
Post a Comment