Thursday, August 4, 2011

पुन्हा आज एकदा हि सुंदर अशी पहाट, नजरेला सुंदर नाही वाटली

पुन्हा आज एकदा हि सुंदर अशी पहाट, नजरेला सुंदर नाही वाटली.

रात्री तुझ्या तो आठवणीतला प्रत्येक क्षण साक्ष देतोय या लाल सुझलेल्या डोळ्यांची.
आणि माझ्या हृदयाचा प्रत्येक भाग सांगतोय मनात तू आणि तूच वसल्याची.

तुझा नाव घेण्याचा तर निम्मित होतं काल मित्राचा,
पण काय करावा या मनातल्या तुझ्या सुंदरश्या चित्राचा.

बोल कधी पाऊसात तू भिजताना मला आठवलस,
नाही तर नेहमीच पाउसाचा पाणी अश्रुंपोटी साठवलस.

नवीन नवीन प्रेमाचे सुरुवातीचे दिवस काही छान होते,
नंतर हळू हळू कळला आता त्याच निवडक दिवसांची हृदयात खान होते.

आधी वाटायचा...
प्रेम म्हणजे तुझ्या माझ्या मनातला गानं,
कि तुझा माझ्या नजरेत... आणि माझा तुझ्या नजरेत कायमचा राहणं.

काय होतं ते...
माझ्या फुटबॉलच्या गप्पांवर पण तुझा ते माझ्यासोबत बसणं,
आणि मला शोप्पिंग नाही आवडत सांगून पण माझा तुझ्यासोबत असणं.

मीच बदललो असतो तर नवल..
मीच बदललो असतो तर नवल..
तुझा स्पोर्ट्स चैनेल TV वर शोधणं मला कळत नसणार...
नाही तर असा म्हणतो,
कुठे तरी उद्या तो काय बोलेल, याचीच गोष्ट मनात घोळत असणार

मला जे वाटतंय,ते तुला वाटत असेलही कदाचित,
अश्रुंसोबत आठवणीत काही रात्री जातीलही कदाचित,

मी कुठे बोलू पुन्हा, माझा काय चुकलेला..
हाच प्रश्न घेऊन दोघांचा मन ते रुसलेला...

विसरणार..
विसरणार म्हणून काय प्रेम पुसून जात नसता गं,
तुझी आठवण पुसायला मित्रांची ती धडपड रोज दिसते गं.

पुन्हा कधी तरी भेटायची आस ती आजवर आहेच,
तुझ्याही अडचणींची जाण ती कुठे तरी आहेच,

आज नाही तर उद्या ती...भेट होईलच ना तशी,
माझ्या आठवणीत घर करून बसलेली जुनी गर्लफ्रेंड हि अशी....!!

No comments:

Post a Comment