त्यादिवशी तू हातात माझा हात घेतलास हाती
त्यादिवशी तू हातात माझा हात घेतलास हाती
म्हणालास नको ना जाऊस थांब ना जराशी ....
डोळे तुझे होते दुखी नव्हता त्यात खट्याळपना
वाटले तुला घ्यावे कवेत नि विचारावे
काय झाले रे माझ्या राजाला
तू शांत होतास पण तुझे डोळे बोलत होते
व्यथा तुझ्या मनाची सांगत होते
मी म्हणाले सांग ना रे आहे मी इथेच तुझ्याजवळ
घरच्यांनी पाहिलीये एक मुलगी वदलास तू
हसून मी म्हणाले अरे इतकेच ना
नकोस घेऊ tension मी देईन ना तुला tution
नाही कसे म्हणयचे आणि नाही कसे म्हणवून घ्यायचे
करतेय हेच तर मी गेले ३ वर्ष आपल्यासाठी
तू म्हणालास नाही ग तू समजतेयस
कसा मी जाऊ मनाविरुद्ध ज्यांनी दिला मला जन्म
........ मी शांत हतबुद्ध ..... हरवले माझे शब्द
समजेना मला ओळखते का मी याला
ज्याच्यासाठी गेले ३ वर्ष मी दुखावतेय माझ्या जन्मदात्यांना
जो होतो आनंदी जेव्हा सांगते हेच मी त्याला रडवेली होऊन
ज्याने समजावंलेय मला अग प्रेम करतेस ना माझ्यावर
प्रेमात असेच असते मी आहे ना तुझ्यासोबत
मी एकवटले माझे बळ आणि बोलले
अरे पहिल्यांदाच पाहतायत ना ते तुझ्यासाठी?
सांगून तर पहा ना त्यांना आपल्याबद्दल
.... बोलला तू नाहीस पण नकार स्पष्ट होता तुझ्या डोळ्यात
मी हरले होते का प्रेमात कि असेच असते प्रेम अपूर्ण? एकतर्फी?
.... समजला प्रेमाचा खरा अर्थ ..उशीर खूप झाला होता आयुष्य संपले होते
प्रेम नसते काळजी तर तो असतो आत्मविश्वास काळजी घेण्याचा
प्रेम नसते जवळीक तर तो असतो आत्मविश्वास नेहमी जवळ ठेवण्याचा
प्रेम नसतेच झुरणे तर ती असते मिलनाची ओढ नेहमीसाठी
हा आत्मविश्वास हि हिम्मत हि ओढ तर नाही ह्या माणसात
अरे हे तर प्रेमच नाही.... क्षणात मोकळी झाले मी
दुखावले तर होते पण ठेच लागून शहाणी झाले होते मी .........
No comments:
Post a Comment