Tuesday, October 23, 2012

आज माझ्या वेदनेला

आज माझ्या वेदनेला
पुन्हा नव्याने जाग आली
बेफिकीर रात्र सरली
अन दुखःची पहाट झाली
किती ओंजारावे किती गोंजारावे
वेदनेला या अजून किती जपावे
लाड पुरवता पुरवता वेदनेचे
सायंकाळहि आता जवळ आली
कधी वाटते लावावे मलम
तर कधी वाटते मारावी फुंकर
तळहाताच्या फोडासम जपताना
आयुष्याचाच ती एक भाग झाली
तुझा स्पर्श वेदनेला होता
सल देण्याचेही ती विसरली
मिठीत तुझ्या विसावताना
वेदना आता सुगंधी झाली
- योगिता

No comments:

Post a Comment