झोपलेलो नसतोच आम्ही कधी
पण आम्हाला जागे करावे लागते
पुढच्या रांगेत बसण्यासाठी
कुणीतरी हाती धरावे लागते
घोषणाबाजी आरोळयानी
आमचे रक्त पेटून उठते
रणांगणात उतरल्यावर
भान हारून मारत सुटते
अगदी इथेच चुकतो आम्ही
डोक्याने लढत नाही
बुधिबळच्या डावातील
वजीरासारखे घडत नाही
मग काय शेवटी शेवटी
देतो आम्ही शिव्याशाप
आमच्याच जन्माचा
काढतो आम्ही आई बाप
पुरुषाच्या जन्माला घातले कुणी मला सांग
थांब थांब जागा हो फेड मर्दा सारे पांग
हाच आवेश संयमाने
घेत घेत लढत राहू
लढता लढता हरलो तरी
विजयासाठी घडत राहू
कुणीतरी झेंडा धरतो
कुणीतरी निस्वा:र्थी मरतो
आमच्या मनासारख झालं नाही की
आम्ही बोटं मोडीत फिरतो
दुसरयाच्या घरात शिवाजी जन्मावा असे
आम्हास काहुन वाटते ?
पुढे नकोच !- म्होरक्यांचे
हाल पाहून वाटते
म्हणून हात झेंड्याला दोन नाही हजार द्या
तू मी सोडून आता एकमुखी विचार द्या
मग कोणी नसेल झूट
मग कधी नसेल फूट
विजयासाठी वळेल फ़क्त
उजवा हात उजवी मुठ
एक विचार एक मत
एक विचार एक छत
विजयासाठी हवाच एक
विजयपथ ! विजयपथ !!
अतुल भोसले ( कोल्हापुर)
८८८८८६२७३७
atulbhosale60@yahoo.in
No comments:
Post a Comment