आकाशातून तुझ्यावर फुलांनी बरसावं ,
तुझ्या पावलाखाली चूरगळंण्यासाठी गवताने ही तरसावं ,
तुझ्या नकळत स्पर्शानिसाठी वारा मुद्दाम वाहतो ,
बघण्यासाठी तुला चंद्रही रात्रीची वाट पाहतो..
तुला त्रास नको नको म्हणून सूर्याने तळपत सोडावे ,
' तळपत राहीला सदा ' ब्रम्हदेवासोबतचं वाचन त्याने तोडावे...
साझंवेळी , जाताना सुर्य चंद्रासोबत तुझ्याचसाठी भांडतो ,
दर सांजेला रोज तुझ्याचसाठीच तो बिचारा रक्त सांडतो ...
रक्ताने माखालेला सुर्य सगळ्यांना लाटांमध्ये दिसतो ,
ह्याच कारणाने सांजवेळीचा सुर्य थोडा लालसर दिसतो ...
देव तुला सवाल करील, " किती जणांना घायाळ केलस ? "
काय देशील उत्तर त्याला, " किती जणांना तू रुपानं वेडं केलस ?"
पण प्रश्न विचारताना देव ही तुझे सौंदर्य पाहील तो ही प्रेमात पडेल ....
निघून जा मग तू .....तो तुझी पाटमोरी आकृती पाहील ....
- Nilesh Bhoir
No comments:
Post a Comment