Tuesday, January 29, 2013

विरक्त जगणे गंमत नाही -------------------



या रचनेला खास अशी एक पार्श्वभूमी आहे. खूप दिवसापूर्वी दोन मैत्रिणी आमच्या गल्लीत रहात होत्य. त्या खास लक्षात राहण्याचे कारण म्हण्जे एकाच सामाजीक, आर्थिक आणि कौटुंबिक वातावरणात राहून त्यांचे असणारे भिन्न स्वभाव आणि निष्ठा. दोघीही एकाच वर्गात शिकत होत्या. एक अतिशय धोपटमार्गी, रुढीपरंपरांना धरून वागणारी. दोन वेण्या, टोकाला रिबिन्स, नेहमी चापून चोपून राहणारी. थोडक्यात म्हणजे संस्कारक्षम आणि साधी अशी होती. दुसरी अगदी त्या विरुध्द. मॉडर्न, तोकडे कपडे घालणारी, बॉय कट असलेली अशी. मी जे सांगतोय ते एक तालुक्याचे ठिकाण असलेले लहान गाव होते म्हणून बॉयकटचा उल्लेख! बोलणे, हसणे त्या वेळच्या प्रथेविरुध्द; म्हणजेच खूप जोराने. वक्तृत्व स्पर्धेत पण हिरिरीने भाग घ्यायची आणि रूढी, प्रंपरांना छेद देणारे विचार मांडायची . मला यात गैर कांहीच वाटत नसे पण त्या काळी त्या दोघीचे स्वभाव आणि त्यांची मैत्री हे चर्चेचे विषय होते. पहिली दुसरीला कधी कधी भान ठेऊन राहण्याचा सल्ला देई तेंव्हा दुसरी तिला सांस्कृतिक डबके म्हणून हिणवीत असे. माझे जीवन प्रवावी आहे असे थाटात म्हणायची'.
यथावकाश दोघीचेही विवाह झाले. पहिली आज रूढ अर्थाने सुखात आहे. दोन मुले, दोघेही अर्थिक दृष्ट्या वेलसेटल्ड. दुसरीने आपल्या आयुषयाशी नवनवे प्रयोग केले जे तिच्या विचारसरणीशी सांगड घालणारेच होते. ती लग्न न करता लिव्ह-इन-रिलेशनशिप मधे रहिली. हे सर्व माझ्या ऐकिवात होते. कांही दिवसापूर्वी ती मला अचानक भेटली. आणि सर्व जुने आठवू लागले. नंतर असे कळाले की ती आता एकटी असते. तातपुरते संबंध संपले. मला कुठे तरी खूप वाईट वाटले. ती कदचित् खुषही असेल कोण जाणे! पण माझ्या परंपरागत विचारसरणीला तिचे जीवन चटका लाऊन गेले.
वरील घटनेने माझे विचारचक्र सुरू झाले. तिला आज आपल्या जीवनबद्दल काय वाटत असेल? हा प्रश्न माझी पाठ सोडेना. मी माझ्या कुवतीनुसार आणि माझ्या मापदंडाने विचार करत ही रचना लिहिली. ही कविता म्हणजे तिने जगलेल्या जीवनावर माझे मत प्रदर्शन नाही. प्रत्येकाला आपले जीवन आपल्या मर्जीप्रमाणे जगायचा हक्क आहेच या बद्दल बिलकुल दुमत नाही.
वाचकांनी ही पार्श्वभूमी ध्यानात घेऊन ही रचना वचावी असे मला वाटते म्हणून हा सारा प्रपंच.


मनी कुणाला जागा द्यावी
माझ्याशी मी सहमत नाही
पाश तोडता मला उमगले
विरक्त जगणे गंमत नाही

एकटेच मी चालायाचा
प्रयत्न केला जरी खूपदा
प्रियाविना भ्याले, गुदमरले
पदरी पडली हार सर्वदा
श्वासालाही निश्वासाविन
जगावयाची हिम्मत नाही
पाश तोडता मला उमगले
विरक्त जगणे गंमत नाही

"प्रेम नको"चा करार केला
लग्नाविन एकत्र राहिले
काम वासना तृप्त जाहली
मुद्दत सरता विभक्त झाले
असे असूनी दोघांनाही
अता वेगळे करमत बाही
पाश तोडता मला उमगले
विरक्त जगणे गंमत नाही

पाप पुण्य मी गौण मानले
सुखात नाही हेच काचते
मी वावरते हास्य लेउनी
आत आसवे गाळत असते
चाकोरी बाहेर, जगी या,
जगणार्‍यांना जनमत नाही
पाश तोडता मला उमगले
विरक्त जगणे गंमत नाही

परंपरेच्या विरुध्द केले
बंड काल अन् सुखावले मी
खळखळ वाटे वहात होते
अता उमगले वहावले मी
डबक्यापुढती प्रवाहास का
कळून आले किंमत नाही
पाश तोडता मला उमगले
विरक्त जगणे गंमत नाही

सायंकाळी तारुण्यातिल
सर्व सोबती निघून गेले
नकळत सारे जीवन माझे
चिमटी मधुनी सुटून गेले
चुका जाहल्या सजा भोगणे
याहुन दुसरी किस्मत नाही
पाश तोडता मला उमगले
विरक्त जगणे गंमत नाही

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

स्पर्श


चोरी छुपके स्पर्श से कंही
जाग उठी थी प्रीत
भीतर जैसे लहर उठी थी
लब पे था एक गीत

बीत गया था हरदिन मेरा
खोजने की फ़िक्र मे
पाँव मे छाले पडे थे
कर सका ना जिक्र मै
उदासियों के अंधियारे
आज गये है बीत
भीतर जैसे लहर उठी थी
लब पे था एक गीत

दबा दबा था हर पल मेरा
जमाने का डर लिए
स्पर्श का जादू है कैसा
होश उडे थे बिन पिये
बंधमुक्त हो चुका हूं मै
तोड के जगकी रीत
भीतर जैसे लहर उठी थी
लब पे था एक गीत

निराश था जीना भी अब तक
हार गया था बाजी
सागर मे बहते जीवन को
आज मिल गया माझी
झलक रही थी हार मे कंही
मेरी अपनी जीत
भीतर जैसे लहर उठी थी
लब पे था एक गीत

धुंधलासा सपना था मेरा
धूमिलसा दिखता था कोई
आस जगी थी मन मे मेरे
जो अबतक थी सोयी
कह नही पाया जो होठों से
कलम से निकला मीत
भीतर जैसे लहर उठी थी
लब पे था एक गीत

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Wednesday, January 23, 2013

ओघळला का पूर असा हा?


आठवणींचा ओघळला का पूर असा हा?
कुणी मिळवला सुरात माझ्या सूर असा हा?

शतजन्माची दोघांचीही ओळख असुनी
या जन्मीही तुला पाहता मागे वळुनी
तुझा चेहरा लज्जेने का चूर असा हा?
कुणी मिळवला सुरात माझ्या सूर असा हा?

एक जमाना झाला नव्हता सूर गवसला
मैफिल होती उदासवाणी, दु:खी गजला
नव्या सुराने कुणी बदलला नूर असा हा?
कुणी मिळवला सुरात माझ्या सूर असा हा?

शुभ्र चांदणे अशात मजला दिसले नाही
स्वप्नांमध्ये काळोखाविन उरले नाही
विरहाने का दाटत आहे ऊर असा हा?
कुणी मिळवला सुरात माझ्या सूर असा हा?

तुझा चेहरा मनात माझ्या घोळात होता
दवबिंदुंचा ओलावाही पोळत होता
वसंत झाला मजवरती का क्रूर असा हा?
कुणी मिळवला सुरात माझ्या सूर असा हा?

विरले आता आठवणींचे अधीर वारे
आज चेतना उरली नाही, बधीर सारे
धुमसत नाही, तरी मनी का धूर असा?
कुणी मिळवला सुरात माझ्या सूर असा हा?


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Tuesday, January 22, 2013

ग़म-ए-बोझ


खयालों मे हर पल मेरे आसपास
सिमटी हुई तेरी छाया खडी है
न जाने फिर भी क्यों ज़िदगी मे
ग़म-ए-बोझ ढोने की आदत पडी है

झरोके से देखूं बाहर की दुनिया
चारों तरफ है खुशियों के मेले
क्या लेके आये किस्मत जहाँ मे
हम ही अंधरे मे पाले अकेले
पता ना चला कब गुजरी दिवाली
देखी न क्या होती फुलझडी है
न जाने फिर भी क्यों ज़िदगी मे
ग़म-ए-बोझ ढोने की आदत पडी है

बहारें चमन से थे फूल चुनने
न जाने काटें आये कहाँ से
बहारों से रिश्ते गये टूटते और
डरने लगा हूं मै अब इस जहाँ से
दामन था फैला खुशियों से भरने
विधाता ने क्यों दी ग़म की लड़ी है
न जाने फिर भी क्यों ज़िदगी मे
ग़म-ए-बोझ ढोने की आदत पडी है

इबादत कर के हर वक्त तेरी
खुशियों के हकदार है सब तेरे
नज़रे- इनायत का है इंतजार
कबसे खडा हूं हे रब मेरे
आशायें सीमित इन्साँ हूं छोटा
परछाई काली क्यूं इतनी बडी है?
न जाने फिर भी क्यों ज़िदगी मे
ग़म-ए-बोझ ढोने की आदत पडी है

ग़मे दर्द की आदत यूं पडी है
ज़नाज़े मे खुशियों के जा ना सके
जीवन से लंबी बडी रात है
लगता है दिन अब आ ना सके
बताते है काटे समय रात का
दिन ना बताये ये कैसी घडी है
न जाने फिर भी क्यों ज़िदगी मे
ग़म-ए-बोझ ढोने की आदत पडी है

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Wednesday, January 16, 2013

ओघळला का पूर असा हा?


आठवणींचा ओघळला का पूर असा हा?
कुणी मिळवला सुरात माझ्या सूर असा हा?

शतजन्माची दोघांचीही ओळख असुनी
या जन्मीही तुला पाहता मागे वळुनी
तुझा चेहरा लज्जेने का चूर असा हा?
कुणी मिळवला सुरात माझ्या सूर असा हा?

एक जमाना झाला नव्हता सूर गवसला
मैफिल होती उदासवाणी, दु:खी गजला
नव्या सुराने कुणी बदलला नूर असा हा?
कुणी मिळवला सुरात माझ्या सूर असा हा?

शुभ्र चांदणे अशात मजला दिसले नाही
स्वप्नांमध्ये काळॉखाविन उरले नाही
विरहाने का दाटत आहे ऊर असा हा?
कुणी मिळवला सुरात माझ्या सूर असा हा?

तुझा चेहरा मनात माझ्या घोळात होता
दवबिंदुंचा ओलावाही पोळत होता
वसंत झाला मजवरती का क्रूर असा हा?
कुणी मिळवला सुरात माझ्या सूर असा हा?

विरले आता आठवणींचे अधीर वारे
अता चेतना उरली नाही, बधीर सारे
धुमसत नाही, तरी मनी का धूर असा?
कुणी मिळवला सुरात माझ्या सूर असा हा?


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Tuesday, January 15, 2013

वाढला संचार येथे


कौरवांचा वाढला संचार येथे
द्रौपदीला ना मिळे आधार येथे

खूप किंचाळ्या तिच्या ऐकून, बहिरे
मर्द सारे शोधती कासार येथे

काय किमया आश्रमी बाबागुरूंची !
नार भाकड राहते गर्भार येथे

लाजही लाजून खाली मान घाली
बेशरम राजेच झाले फार येथे

काम सरकारी निघाया व्यर्थ चकरा
निर्णयांचे थाटले बाजार येथे

फोडली वाचा गुन्ह्यांना, हा गुन्हा का?
मी कशाला आज ताडीपार येथे?

मृगजळामागे पळावे, ध्यास इतका
वास्तवांचे मोडले संसार येथे

सूर्य भित्रा का असा ढोलीत लपला?
अश्वमेधाला निघे अंधार येथे

मंदिरे होती कधी का ईश्वराची?
भरवती बडवे सदा दरबार येथे

तत्व का "निशिकांत" सोडावे जगाया
जाउ दे! धेंडास मिळती हार येथे


निशिकांत देशपांडे मो. क्र.९८९०७ ९९०२३
E Mali-- nishides1944@yahoo.com

ती

सख्यांच्या सहवासात रमनारी ती एक 'मैत्रिण' असते......
तो आपल्याशिच लग्न करेल ना? अशी हुरहुर वाटानारी ती एक
'प्रेयसी' असते.........
नवार्याची घरी यायची नेहेमीची वेळ
गेली की काळजी करणारी ती एक 'बायको' असते....
मुलाना उशीर झाला की व्याकुलतेने वाट पाहनरी ती एक 'आई'
असते.........
बाबांचा राग झेलनारी ती एक 'मुलगी' असते......
भाऊबिजेला भावाकडून भेट मिलाल्यावर आनंद होनारी ती एक
'बहिन' असते............
आयुष्यात अशी नाती जपनारी ती एक ' शेवटी एकटीच असते...

-
Marathi Actress

ही मैत्री म्हणजे काय ?

शाळेत त्या चिमुकल्याचा पहिलाच दिवस होता,
तो घाबरत होता ;
पण त्याच्याबरोबर त्याच्या शेजारचीच एक मुलगी होती.
ती एका वर्षाने त्याच्या पेक्षा मोठी होती;
पण खूपच समजूतदार होती.
ती त्याला समजवून घेऊन गेली.
ब्रेक टाइम मध्येहि त्याच्या कडे गेली.
त्याचे डोळे पुसले आणि त्याला समजावले कि बघ सगळे कसे छान खेळत आहेत तुही खेळ मजा कर.
तिने समजवल्यावर तोही खेळू लागला.
त्याला आता तिची सोबत आवडू लागली.
रोज तिच्या बरोबर शाळेत जायचा आणि परत यायचा.
घरी आल्यावरही तिच्याबरोबर अभ्यास करायचा.
तो हट्टी होता.
पण ती त्याला समजावयाची,
त्याच्या कडून अभ्यास करून घ्यायची.
त्याने काही ऐकले नाही कि म्हणायची
, 'तू मित्र आहेस ना माझा ?
' मग मैत्रीत अस नाही करायचं तोही तिचे ऐकायचा;
पण त्याला एक गोष्ट समजत नव्हती,

ही मैत्री म्हणजे काय ?
त्याने शेवटी तिला विचारले,
' ही मैत्री म्हणजे काय ?
' तीही गोंधळली तिला काय उत्तर द्यावे कळेना,
थोडा वेळ विचार केल्यानंतर ती त्याला म्हणाली,
'तू रोज माझ्या दफ्तर|मधून गुपचूप चॉकलेट कडून घेतोस आणि तरीही मी रोज तिथेच चॉकलेट ठेवते यालाच मैत्री म्हणतात..............................................!!!!!!!!!!!!!!


मलाही वाटते की प्रेमात पडावे ।।

मलाही वाटते की प्रेमात पडावे ।
मलाही वाटते की प्रेमात पडावे ।

कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे,
आणि तीच्यासाठी मीही किँचीतसे झूरावे ।

महिन्यातून एकदा तीने उगाचच रूसावे,
आणि मी मनवता- मनवता खुदकन हसावे ।

राञभर फोनवर तीने मला सतवावे,
दिवसभर मी तीला भेटीसाठी पटवावे ।

कुठेतरी एकांतात चोरून भेटावे,
आणि जान्यासाठी घाई
म्हणून मी तीच्यावर रागवावे ।

दोन दिवस अबोला पाळुन एकमेकांना आठवावे,
मग छोटेसे प्रेमपञ तीने मला पाठवावे ।

यदा -कदाचीत असे घडावे,
मलाही वाटते की प्रेमात पडावे ।।

-
Nilesh Bhoir

Wo Puchti Hai Mujse

Wo Puchti Hai Mujse "Tum Mujhe
Itna Pyaar Kyun Krte Ho..?? "
.
Mene Kaha Ek Tamannna He
Tumhe Pane Ki.. ♥

Wo Puchti Hai "Har WaqtKyun
Udas Rehte Ho..??''
.
Mene Kaha Koshish He Tumhe Har
Khushi Dilane Ki.. ♥

Wo Kehti Hai "Har Waqt Kyun Sochte Ho..??"
.
Mene Kaha Aadat Ho Gai He
Tumhe Khayalo Me Apna Banane Ki..


Wo Kehti Hai "Kabhi Chand Bhi Chahkr ApnaHua Hai..??"
.
Mene Kaha Ek Umeed He Is Umeed Me Zindgi
Beetane Ki..

Wo Kehti Hai "Me Na Mili To..??" .

Mene Kaha To Koshish Karunga
Zindgi Mitane Ki.. ♥

Wo Kehti Hai "Tumhe Kya Milega
Mar Kar..??"

Mene Kaha Ek Umeed Agle Janam
Me Tumhe Apna Banane Ki..!!

-
Nilesh Bhoir

असं व्हावं ........

आकाशातून तुझ्यावर फुलांनी बरसावं ,
तुझ्या पावलाखाली चूरगळंण्यासाठी गवताने ही तरसावं ,

तुझ्या नकळत स्पर्शानिसाठी वारा मुद्दाम वाहतो ,
बघण्यासाठी तुला चंद्रही रात्रीची वाट पाहतो..

तुला त्रास नको नको म्हणून सूर्याने तळपत सोडावे ,
' तळपत राहीला सदा ' ब्रम्हदेवासोबतचं वाचन त्याने तोडावे...

साझंवेळी , जाताना सुर्य चंद्रासोबत तुझ्याचसाठी भांडतो ,
दर सांजेला रोज तुझ्याचसाठीच तो बिचारा रक्त सांडतो ...

रक्ताने माखालेला सुर्य सगळ्यांना लाटांमध्ये दिसतो ,
ह्याच कारणाने सांजवेळीचा सुर्य थोडा लालसर दिसतो ...

देव तुला सवाल करील, " किती जणांना घायाळ केलस ? "
काय देशील उत्तर त्याला, " किती जणांना तू रुपानं वेडं केलस ?"

पण प्रश्न विचारताना देव ही तुझे सौंदर्य पाहील तो ही प्रेमात पडेल ....
निघून जा मग तू .....तो तुझी पाटमोरी आकृती पाहील ....

-
Nilesh Bhoir

Wednesday, January 9, 2013

रंगवून झाले


असंख्य धागे विणून झाले
वस्त्राला रंगवून झाले

उरलो मी उपकारापुरता
माझे जगणे जगून झाले

झोप कशाला घ्यावी आता?
स्वप्न हवे ते बघून झाले

राम न वाटे जीवनातही
उठता बसता हरून झाले

तुला शोधण्या धुक्यात जाता
दवात थोडे भिजून झाले

भिकार जीवन जगता जगता
शंभर वेळा मरून झाले

विरहाच्या प्याल्यास रिचवता
नशेमधे लडखडून झाले

करताना मुल्यांकन माझे
शुन्यासंगे गुणून झाले

समजत होतो अपुले त्यांना
अस्तिनीमधे बघून झाले

"निशिकांता"च्या तृप्त जीवनी
करायचे ते करून झाले

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Tuesday, January 8, 2013

कटते है दिनरात मेरे


जीवनसी भरी मुस्कान तेरी
रहती है पल पल साथ मेरे
तेरी यादमे खोये खोये
कटते है दिनरात मेरे

संगमरमरी रूप सुहाना
चेहरा खिलता हुआ गुलाब
कुंतल काले बादल जैसे
नयनन छलकातें है शराब
मंडराते भंवर से बीते
हफ्तेके दिन सात मेरे
तेरी यादमे खोये खोये
कटते है दिनरात मेरे

तेरी गलीमे, सुना लगा है
आशिक लोगोंका ताता
भयभित हूं होकर मेरा
जनमों का तुझसे नाता
पाया तुझको और किसीने
क्या होगे हालात मेरे?
तेरी यादमे खोये खोये
कटते है दिनरात मेरे

यूं तो खोनेका आदी हूं
तुझको खो ना पाउंगा मै
अगर सामने मौतभी आये
तुझे छोड क्यों जाउंगा मै?
बिन तेरे यह कौन भरेगा
ज़ख़मोंके आघात मेरे?
तेरी यादमे खोये खोये
कटते है दिनरात मेरे


निशिकांत देशपांडे मो.क्र.९८९०७ ९९०२३
E Mail--nishides1944@yahoo.com

Tuesday, January 1, 2013

नवीन साली मिळो उभारी

नवीन साली मिळो उभारी


श्वास भरूनी धेय दिशेने
करू तयारी उडावयाची
नवीन साली मिळो उभारी
नव्या दमाने उडावयाची

जे सरले, गंगेत मिळाले
नको बेरजा वजावटीही
आळवूत या नवीन गाणे
नवे ताल अन् सुरावटीही
असोत स्वर वादी संवादी
सुरेल गोडी जपावयाची
नवीन साली मिळो उभारी
नव्या दमाने उडावयाची

नको फुलांचे अन् पानांचे,
तोरण लाऊ माणुसकीचे
"फक्त जगावे अपुल्यासाठी"
धोरण बदलू वागणुकीचे
नको मुखवटे, आस जागवू
सभ्य माणसे बनावयाची
नवीन साली मिळो उभारी
नव्या दमाने उडावयाची

डोळ्यामध्ये तेल घालुनी
सावध सारे सचेत राहू
अत्त्याचारा विरुध्द लढण्या
स्फुरण पावू दे सदैव बाहू
हिंमत होवो कधी न कोणा
कळ्या कोवळ्या खुडावयाची
नवीन साली मिळो उभारी
नव्या दमाने उडावयाची

मी न कधीही ईशकृपेचा
केला गाजावाजा आहे
कुठे पोंचलो? काय जाहलो?
शिल्पकार मी माझा आहे
भाळावरची नशीब रेषा
उगाच का मग बघावयाची?
नवीन साली मिळो उभारी
नव्या दमाने उडावयाची

कधी फुलांची शेज नव्हे हे,
जीवन म्हणजे एक लढाई
सदैव तत्पर संकटावरी
निर्णायक करण्यास चढाई
बघावयाची वाट कशाला?
पुन्हा नौबती झडावयाची
नवीन साली मिळो उभारी
नव्या दमाने उडावयाची


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com