गाळलेल्या आसवांना भाव नाही
जाणणारा वेदना हा गाव नाही
तू दिलेले मी विसरलो घाव नाही
लाख जखमा, थांबलेला स्त्राव नाही
मारुती वेशीत आहे रक्षणाला
पण तरी चोरास का मज्जाव नाही
लागती पैसे विठूच्या दर्शनाला
राहिला भक्तास पहिला भाव नाही
चोरली माझी गझल ज्या चोरट्याने
ठेवले मक्त्यात माझे नाव नाही
झाकण्याला हार झालेली कधीही
जिंकल्याचा आणला मी आव नाही
बक्षिसासाठीच तंटामुक्त खेडी
भांडणाचा पण तिथे आभाव नाही
शोध घेता माणसांचा, श्वापदे का
भेटती सगळीकडे हे ठाव नाही
वाट काटेरी पुढे "निशिकांत" आहे
पण तुला आता गड्या घुमजाव नाही
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com
No comments:
Post a Comment