Monday, December 31, 2012

स्वागतम नव वर्ष का


फासला मिटता रहे
कारवाँ बढता रहे
मंज़िलों की हर सिढी
हर कोई चढता रहे

हवा मे है ताज़गी
और क्षितिज पर लालिंमा
नज़र न आये कंही
निशा तेरी कालिमा
पर लगा कर पंछियोंके
हर कोई उड़ता रहे
मंज़िलों की हर सिढी
हर कोई चढता रहे

दिलमे हो झंकार हरदम
गीत और संगीत का
हर कोई खुल कर करें
ज़िक्र अपने मीत का
एकही हो तार दिलमे
दिलरुबा छिडता रहे
मंज़िलों की हर सिढी
हर कोई चढता रहे

साल मे नव हर जगह
उजाले मिल जायेंगे
याद कर गुज़रे दिनों के
अंधेरे क्या पायेंगे?
मिल गये फिर भी अंधेरे
हर कोई लड़ता रहे
मंज़िलों की हर सिढी
हर कोई चढता रहे

स्वागतम नव वर्ष का
खोल कर बाहें करें
बीज बोने नफ़रतों का
काम हम काहें करें?
चंद अक्षर प्यार के
हर कोई पढता रहे
मंज़िलों की हर सिढी
हर कोई चढता रहे


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Saturday, December 29, 2012

अजबसा है चमन यारों

अजबसा है चमन यारों

आज पहाटे तिने शेवटचा श्वास घेतला. तिच्या शेवटच्या श्वासाने पूर्ण देशाचा श्वास गुदमरला. माझे स्पष्ट मत आहे की जेंव्हा असाह्य तरुणीवर बलात्कार होतो तेंव्हा तिची अब्रू तर लुटली जातेच पण खर्‍या अर्थाने समाजाची आणि देशाची अब्रूच लुटली जात असते हे सर्वांनी ध्यानात ठेवायला हवे.
पण एक गोष्ट खरी की त्या पिडित मुलीचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. या घटनेमुळे संपूर्ण देश आणि विशेषतः तरुणाई ढवळून निघाली आहे.. हा भविष्यासाठी शुभशकून ठरावा.
शासन आणि राजकारणी यांच्या बद्दल काय बोलावे ! सारेच संवेदनाहीन जनावरे. लहान लहान कारणासाठी कायदा हातात घेणारे, बसेसची तोडफोड करणारे, रास्ता रोको करणारे शूरवीर कुठे लपले आहेत? एका शब्दानेही ते बोलत नाहीत. ही आज देशाची शोकांतिका आहे. यातून मार्ग निघायलाच हवा. या बाबत शासन कांही करेल अशी अपेक्षा कुणीही करू नये. शेवटी तरुणाईनेच पुढाकार घ्यायला हवा.
पण इतिहास सांगतो की अशा घटना आणि अंदोलने पावसाळ्यातील कुत्र्याच्या छत्रीचे (मश्रूम) अल्पायुष्य घेवून येतात आणी जातात. पुन्हा वर्षाखेरसाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पार्ट्या होणार. पुन्हा मदहोश वातावरण आणि कांही स्त्रियांच्या अब्रूंचे धिंडवडे! शेवटी "जन पळ भर म्हणतिल हाय हाय" हेच खरे. असे झाले तर ब्रेव्हहर्ट मुलीचा आत्मा स्वर्गात कण्हेल "हेच फल काय मम तपाला". अर्थात मला निराशावादी होणे आवडत नाही. लवकरच पहाट होईल, सूर्य उगवेल. या सकारात्मक घटनेसाठी वेळ आणि निमित्त हवे होते नियतीला कदाचित. ते दोन्ही आज मिळाले आहेत.
मी या घटनेने खचून गेलो होतो. उद्वेगाच्या भावनेतून दोन रचना केल्या. आज निधनाची वर्ता ऐकून पुन्हा माझ्यावर अघात झाला. मी आज ही दुर्दैवी बातमी एका उर्दू टीव्ही चॅनल ऐकली म्हणून कविता उर्दूतून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. मला पूर्ण कल्पना आहे की माझ्या एका कवितेमुळे कांही फरक पडणार नाही. पण माझा अक्रोश व्यक्त करण्याचा हाच एकमेव मार्ग माझ्या हाताशी आहे.
सुरुवातीलाच कांही उर्दू शब्दांचे अर्थ वाचकाच्या सोयीसाठी दिले आहेत
१) माजरा--घटना २) हैवानियत--जनावरा/पशूसारखे वागणे ३) मोहताज--अवलंबून असणे, दीन असणे
४)ज़हमत-- त्रास, वेदना ५) फ़ित्रत-- स्वभाव ६) रूबरू--समोरा समोर, फेस टु फेस
७) इर्शाद-- मुशायर्‍यात ग़ज़ल्/शेर वाचण्यास श्रोत्यांनी दिलेली परवानगी ८) मातम--शोक, मोर्निंग
९) मरघट-- स्मशान भूमी

ना फूलका मौसम यहाँ
तितलियाँ दिखती नही
अजबसा है चमन यारों
कलियाँ यहाँ खिलती नही

लूट ली इज़्जत किसी की
माज़रा यह रोज़ का
क्या है जल्दी? मामला है
एक लंबी खोज का
फैसला आये न आये
ज़िंदगी रुकती नही
अजबसा है चमन यारों
कलियाँ यहाँ खिलती नही

भेडियोंका ख़ौफ इतना
हैवानियत का राज है
इस कदर हालात बिगडे
इन्सानियत मोहताज है
छा गया इतना अंधेरा
रोशनी दिखती नही
अजबसा है चमन यारों
कलियाँ यहाँ खिलती नही

इज़्जतोंके लुटेरोंको
डर नही, ज़हमत नही
गुनहगारोंको सज़ा दे
देश की फ़ित्रत नही
आइनेसे सूरतें भी
रूबरू करती नही
अजबसा है चमन यारों
कलियाँ यहाँ खिलती नही

ना कंही गजलें सुनी है
ना कभी इर्शाद भी
ना बाग़ावत शायरोंने
की कभी फर्याद भी
महफ़िलें गुमसुम यहाँ की
क्यूं शमा जलती नही
अजबसा है चमन यारों
कलियाँ यहाँ खिलती नही

ढेर लाशोंके पडे है
क्यों नही मातम कंही?
साँस लेते लोग है पर
ज़िंदगी जीते नही
गाँव मरघट बन गया पर
लाश भी जलती नही
अजबसा है चमन यारों
कलियाँ यहाँ खिलती नही

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Wednesday, December 26, 2012

एकावास


एक अकेला एकावास
हर पल लंबा और उदास

भीड़ भरी बस्ती में अब क्यूं
गलियारें हो गये है सूने
था कारवाँ इर्द गिर्द में
पल पल रिश्ते थे बूने
ना जाने क्यूं ना रह पाता
खुद ही अपने खुद के पास?
एक अकेला एकावास
हर पल लंबा और उदास

आस लगाकर धडकन थामे
इंतज़ार उनके आने का
जुनून है गुल होने का और
खो कर खुदको पाने का
दस्तक सुनते ही लगता है
आया कोई अपना खास
एक अकेला एकावास
हर पल लंबा और उदास

ना जाने यह रात गुज़रने
कितने लग जायेंगे बरस
ख़स्ता हालत खराब मेरी
सब खाते है मुझपे तरस
ग़ैर भी अभी लगे है देने
अपने होने का अहसास
एक अकेला एकावास
हर पल लंबा और उदास


निशिकांत देशपांडे  मो.क्र,९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Tuesday, December 25, 2012

तुझीच आठवत प्रीत होतो


उबार्‍यात मी पंखाखाली
थंड चांदण्यास पीत होतो
विरहकाळच्या अवसेला मी
तुझीच आठवत प्रीत होतो

लपाछपीचा खेळ खेळता
तुझी मस्करी करीत होतो
व्यर्थ शोधले, मी तर लपलो
गालावरच्या खळीत होतो

ग्रिष्म जसा तुज छळू लागला
मी पडलो काळजीत होतो
तुला गारवा देंण्यासाठी
आलो श्रावणसरीत होतो

मला उदासी कधी न शिवली
समीप तुझिया खुशीत होतो
रोज नव्याने माळलेस त्या
गजर्‍याच्या टवटवीत होतो

तुला वाटले तुझ्याविना मी
विरहाच्या तावडीत होतो
कयास चुकला तुझा, मी तुझ्या
स्वप्नांच्या पालखीत होतो

गुदमरलो मी तुझ्या जरासा
आठवणींच्या धुळीत होतो
कुणात रमलो?, मी तर वेडे
तुजवर कविता लिहीत होतो

शमा पाहिली तेवत असता
म्हणून मी मैफिलीत होतो
परवान्यासम जळण्यासाठी
आस मनी जागवीत होतो

कधी जाहले प्लॅटोनिक लव्ह?
शोधत मी डायरीत होतो
तू चौथीच्या बोर्डाला अन्
मजनू मी सातवीत होतो


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Sunday, December 23, 2012

मी किती ते आवरावे?


आठवांच्या अडगळीला
कारणाविन का जपावे?
अन् पसार्‍याला मनीच्या
मी किती ते आवरावे?

जे सुखाचे क्षण दिले तू
काचती आता मनाला
कोंडल्याने अंतरी ते
दु:ख वाटे हर क्षणाला
सांगण्या सल हा मनीचा
मी कुणाला बोलवावे?
अन् पसार्‍याला मनीच्या
मी किती ते आवरावे?

ना कुठेही आडपडदा
पारदर्शक हा असा मी
जे मनी ते बोलण्याचा
घेतला आहे वसा मी
काळजाला मुखवट्याने
वेगळे का रंगवावे?
अन् पसार्‍याला मनीच्या
मी किती ते आवरावे?

छेडले होते तराने
मी सतारीवर जरासे
का अशा तुटल्यात तारा?
काय कामाचे खुलासे?
हरवलेला सूर असता
गीत कुठले गुणगुणावे?
अन् पसार्‍याला मनीच्या
मी किती ते आवरावे?

झोपल्यावर रोज रात्री
तू अशी येतेस का?
जाग आल्यावर त्वरेने
सांग तू विरतेस का?
जाग का आली म्हणूनी
रोज मी का हळहळावे?
अन् पसार्‍याला मनीच्या
मी किती ते आवरावे?


निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Tuesday, December 18, 2012

एक कोपरा दाखव देवा

एक कोपरा दाखव देवा
परवा दिल्लीत बसमधे एका तरुणीवर कांही श्वापदांनी बलात्कार केला. ही बातमी वाचून आणि टी.व्ही.वर या बाबत चर्चा ऐकून मन उद्विग्न झाले. प्रथमच मला मी एक भारतीय असल्याची लाज वाटली. अतिशय दु:खी मनाने ही रचना लिहिली नाही तर कलमेतून आसवांप्रमाणे ओघळलेली आहे. प्रस्तूतः

तारुण्याच्या लोण्यासाठी
शक्य कसे हे? बोका नाही
एक कोपरा दाखव देवा
जिथे स्त्रियांना धोका नाही

मला वाटते स्त्रीची अब्रू
मळलेल्या कणकीसम असते
घरात उंदीर कुरतडती अन्
गिधाड बाहेर चोंच मारते
एक रात्रही नसते जेंव्हा
चुकला ह्रदयी ठोका नाही
एक कोपरा दाखव देवा
जिथे स्त्रियांना धोका नाही

कसा कायदा देशामध्ये?
बलात्कारिता दु:ख भोगते
पळवाटांचा घेत सहारा
नराधमांचे खूप फावते
अटके आधी मिळे जमानत
बाल तयांचा बाका नाही
एक कोपरा दाखव देवा
जिथे स्त्रियांना धोका नाही

इमाम, पाद्री, भगवे साधू
सभ्य मुखवटे, क्षुद्र माणसे
धर्म अफूची गोळी देती
कुणी न पाळी तत्व फारसे
सार्‍या नजरा वखवखलेल्या
कुणीच बाबा काका नाही
एक कोपरा दाखव देवा
जिथे स्त्रियांना धोका नाही

नराधमाला स्त्रीलिंगी अन्
पतिव्रतेला पुल्लिंगी का
शब्द नसावा? तुझी माणसा
हीच खरी रे शोक-अंतिका
सभ्य मुखवटा टिकून असतो
जोवर गावत मौका नाही
एक कोपरा दाखव देवा
जिथे स्त्रियांना धोका नाही

ऐलतिराची गंगा थकली
धुवून पापे दुष्टजनांची
काय राहिले जगात आता?
ओढ लागली पैलतिराची
तरावयाला भवसागर हा
आज कुठेही नौका नाही
एक कोपरा दाखव देवा
जिथे स्त्रियांना धोका नाही


निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

बाबा.. ( तुमच्यासारखे तुम्हीच )

चुली जवळ माय,
तर कंपनीत तुम्ही राबत होता..
.
.
माझी वाट तुम्ही,
ते नऊ महिने पाहत होता..
.
.
पाळण्यात मला पाहून,
पेढे वाटायलाही पळाला होता..
.
.
बोटाला तुमच्या धरून,
शाळेत दाखला मी घेतला होता..
.
.
फाटकी बनियन तुम्ही,
तर नवीन गणवेश
मी घातला होता..
बाबा,
.
.
तेंव्हाही तुम्ही माझ्यासाठी फार-फार मोठे
होता...!!
.
.
ताप मला असो का ताईला,
रात्र-रात्र तुम्ही जागत
होता..
.
.
शाळेचा खर्च वाढल्यामुळे, ओवरटाइमही तुम्हीच करत
होता..
.
.
बाबा,
तेंव्हाही तुम्ही माझ्यासाठी फार-फार मोठे
होता...!!
.
.
देवा,
आता मात्र मला,
त्यांच्यासाठी कष्टकरू दे..
.
.
तू फक्त आता,
जगातील सर्व बाबांना,उदंड आयुष्य दे... :)

Friday, December 14, 2012

बेगाने रह गये

लब पर उदास विरह के
दो गाने रह गये
इतने करीब आ कर भी
बेगाने रह गये

मंज़िल नही थी और कोई
जाये तो किधर जाये?
सुनता नही है आज कोई
गाये तो किधर गाये
आरमाँ बहूत थे सोये
जगाने रह गये
इतने करीब आ कर भी
बेगाने रह गये

मुसकान झलकती थी मेरी
मेरी हर एक बात पर
लिखा था नाम तुमने मेरा
नर्म रेत पर
गाने मिलनके साज पर
बजाने रह गये
इतने करीब आ कर भी
बेगाने रह गये

हम से कभी न आया गया
ना तुम बुला सके
दुनिया के डर को कभी
ना हम भुला सके
मौसम था प्यार का मगर
अनजाने रह गये
इतने करीब आ कर भी
बेगाने रह गये


निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३


Thursday, December 13, 2012

मैफल...

यमुनेतीरी, पुन्हा राधिका
अवखळ होते कधीतरी...
मैफल रंगे, स्वतःशीच अन
नाम मुखाशी हरी हरी...
...
पाहूनी तिचे, रुप गोजिरे
कान्हा हरवत जाई रे...
बघूनी त्याला, राधेचे मन
गोकूळ गोकूळ, होई रे...

महेश घाटपांडे

डोळे मिटताच... आता फक्त तुच दिसतेस...

डोळे मिटताच आता
फक्त तुच दिसतेस...

हदयात हि माझ्या
आता फक्त तुच राहतेस,

स्वप्नात हि मला आता
रोज भेटतेस,

अन् खरोखर तु समोर
येताच फक्त एक स्वप्न
म्हणुन वाटतेस...

काय करू मी? कसं
सांगु गं तुला?

खरोखर खुप प्रेम करतो
गं तुझ्यावर,

म्हणुन तर काय? क्षणो-
क्षणी आता मला, 
फक्त तुच भासतेस,

अन् माझी नसुनही, फक्त
तू माझीच वाटतेस...

अन् माझी नसुनही, फक्त
तू माझीच वाटतेस...

Thursday, December 6, 2012

आसवांना भाव नाही


गाळलेल्या आसवांना भाव नाही
जाणणारा वेदना हा गाव नाही

तू दिलेले मी विसरलो घाव नाही
लाख जखमा, थांबलेला स्त्राव नाही

मारुती वेशीत आहे रक्षणाला
पण तरी चोरास का मज्जाव नाही

लागती पैसे विठूच्या दर्शनाला
राहिला भक्तास पहिला भाव नाही

चोरली माझी गझल ज्या चोरट्याने
ठेवले मक्त्यात माझे नाव नाही

झाकण्याला हार झालेली कधीही
जिंकल्याचा आणला मी आव नाही

बक्षिसासाठीच तंटामुक्त खेडी
भांडणाचा पण तिथे आभाव नाही

शोध घेता माणसांचा, श्वापदे का
भेटती सगळीकडे हे ठाव नाही

वाट काटेरी पुढे "निशिकांत" आहे
पण तुला आता गड्या घुमजाव नाही


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Monday, December 3, 2012

दाटते आहे निराशा फार हल्ली


वाटते घ्यावी जरा माघार हल्ली
दाटते आहे निराशा फार हल्ली

पाप इतके जाहले हातून माझ्या
मी लपाया शोधतो अंधार हल्ली

माणसे गेली कुठे? ओसाड वस्ती
का भुतांचा वाढला संचार हाल्ली

मी लढू आता कुणाशी? सर्व अपुले
लावतो शस्त्रास मी ना धार हाल्ली

हद्दपारी जाहली संभाषणांची
का मनाचे बंद असते दार हल्ली?

मीच माझे पाप निस्तारीन म्हणतो
कोण देतो का कुणा आधार हल्ली?

सांगती जे अर्थ गीतेचा, तयांना
ज्ञात नसते जीवनाचे सार हल्ली

मंदिराचे दार मिटले, वेळ झाली
रात्रभर असतात उघडे बार हल्ली

भीड बघता पापियांची स्नान करण्या
घाबरे गंगा नदीही फार हल्ली

सोडले "निशिकांत"ने प्रतिकार करणे
प्राक्तनाचा खात जगतो मार हल्ली


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com