Wednesday, April 18, 2012

मनात नेहमी तीच असते

नेहमी तिची तक्रार असते... मी म्हणे कधी बोलत नाही...
आणि तिच्यापुढे माझं मन... मी कधी खोलत नाही...
तिला कितीही म्हणालो... "तुझ्याशिवाय माझं चालत नाही..."
तिला वाटतं मस्करी करतो... मग तिही माझ्याशी बोलत नाही...
आणि असं मुकं मुकं आमच नात वाढत नाही...
का जाणे कुणास ठाऊक... माझं प्रेम तिला दिसत नाही...
नशिबाने तिचा हा अबोला फार काळ टिकत नाही...
बोलायला लागली की शब्दांना मुकत नाही...
मान्य आहे नसतील कळत... तिला माझ्या कविता...
माझी काळजी करणारी नजर... तिला कशी कळत नाही
मैत्रीण गमवायची नाहीये... म्हणुन मी बोलत नाही...
मनात नेहमी तीच असते

__ X Person

No comments:

Post a Comment