Wednesday, April 18, 2012

पहीलं पहीलं प्रेम

पहीलं पहीलं प्रेम
अचानक नकळत झालेलं
सगळ्यानपासुन लपवलेलं
तरी सुधा
 सगळ्यांना कळलेलं

पहीलं पहीलं प्रेम
पहील्यांदा अनुभवलेलं
मी तीला आणी तीने मला
प्रेम करायला शीकवलेलं
तरी सुधा
 शीकायचे काहीतरी
बाकी राहीलेलं

पहीलं पहीलं प्रेम
थोडसं निराश झालेलं
घरी कळाले तर काय
म्हणून थोडं घाबरलेलं
तरी सुधा
न घाबरता खरं
प्रेम नीभावलेलं

पहीले पहीले प्रेम
थोडक्यातच संपलेलं
तीच्या अचानक जाण्याने
दुखावलेलं
तरी सुधा
अजुनही तीच्याच
आठवणीत रमलेलं

असच काहीसं होतं
माझं प्रेम अधुरं राहीलेलं....

Mahesh parge( Mohi Raj )


No comments:

Post a Comment