माहित आहे तू कधी प्रेम दाखविले नाहीस
अश्रूंना हि तुझ्या तू
कधी सामोरी गाळले नाहीस ....
डोळ्यांत माझ्या
स्वनांचा महाल बांधून गेलीस
प्रेमाच्या फुलांना तू बोलके करून गेलीस....
प्रेम होते दोघांचे
पण....
भेट आपली घडलीच नाही
हातात हात धरून
मला सांभाळ स्वता:ला म्हणालीस
पण....????
सांभाळणे हे खूप कठीण ग
तुझ्याविना जगणे असंभवच
वाट पाहत राहील आयुष्यभर
तुझ्या आठवणी सोबत मी जगतोय
येशील तू सोडून सारे
ह्या वेड्या आशेवर
माझ्या एकांताला दूर करुनी
होशील माझीच अन फक्त माझी ....
-
© प्रशांत शिंदे
No comments:
Post a Comment