Tuesday, April 3, 2012

पावूस पडून गेल्यावर अस होत

पावूस पडून गेल्यावर अस होत
पावसा नंतर झालं-गेलं आठवत,
नकळत! माझ हळवं मन पुन्हा
अश्रूंच्या तावडीत ओलं सापडत,

पावूस पडून जातो, पण...!
मनाला भिजवून जात नाही
रुसून असतो मग मी असा,
तिच्याशिवाय माझा रुसवा
कोणी कधीच काढत नाही,

वेळेसोबत वसंताची नवी पालवी उमलते, पण....,
सोबत बरसलेला पावूस पुन्हा भिजवत नाही
पावूसsssss आठवणीतच मग बरसत राहतो,
नव्या उमेदीने-चैतण्याने, कोमेजल्या मनाला
भिजवत राहतो, असा पावूस नेहमीच बरसतो,
आठवणींच्या देशात खट्याळ हसत राहतो,
तिचा-माझा पावूस असा बेधुंद बरसत राहतो.....
.
मृदुंग
०२.०४.२०१२

No comments:

Post a Comment