Friday, March 8, 2013

ज्याच्या हातून चुका न झाल्या तो माणूस कसला

ज्याच्या हातून चुका न झाल्या तो माणूस कसला
ज्याच्या मनी खंत नसावी तो शूर कसला

जेव्हा रडुनी माफी मागितली ती वेळच नाही
काय मिळेल माफी मागुनी कळलेच नाही
बाजू कुणाची कधी घ्यावी न्याय न समजला
जेव्हा दोन्ही बाजू बरोबर न्याय तिथेच संपला

ज्याच्या हातून चुका न झाल्या तो माणूस कसला
ज्याच्या मनी खंत नसावी तो शूर कसला

समाज समतोला रहाण्या का हो नियम बनविले
ज्या नियमांना साथ न कुणाची ते नियम कसले
नियम जे जुनेपुराणे नवा न समजला
नियम तेही धाब्यावर बसविण्या तो मागे न हटला

ज्याच्या हातून चुका न झाल्या तो माणूस कसला
ज्याच्या मनी खंत नसावी तो शूर कसला

समाजाची चौकट देवा अशी का बनविली
जे आम्हास मान्य असुनी पुढे चाले न काही
जर माझ्या मनावर माझा ताबा नसला
घटक्यात होती मने बेचीराख विचार कसला

ज्याच्या हातून चुका न झाल्या तो माणूस कसला
ज्याच्या मनी खंत नसावी तो शूर कसला

उदया काय होईल कुणास समजले
कालच्या अश्रुनी माझे हृदय भिजले
भविष्य असेल न चांगले वर्तमानी समजला
त्याच एका तर्कावारी तो मागे हटला

ज्याच्या हातून चुका न झाल्या तो माणूस कसला
ज्याच्या मनी खंत नसावी तो शूर कसला

झुकुनी शस्त्र टाकण्यात भरुनी आली छाती
युद्धांत मागे हटन्यात का वाटावी भीती
हिंसेहून असे अहिंसा प्यारी हे जो समजला
शांती अन् प्रेमाचा संदेश देण्या पाय पुढेच पडला

‌ज्याच्या हातून चुका न झाल्या तो माणूस कसला
ज्याच्या मनी खंत नसावी तो शूर कसला

शेवटी असेच म्हणावे लढूनी की माझेच सत्य
की म्हणावे गप्प बैसोनी तुमचेच सत्य
थोरामोठ्यांच्या इशाऱ्यास ज्याने न्याय न दिला
असे इतिहास साक्षी तो तिथेच संपला

‌ज्याच्या हातून चुका न झाल्या तो माणूस कसला
ज्याच्या मनी खंत नसावी तो शूर कसला

Posted By : Acharekar Paresh
http://pareshacharekar.wordpress.com/2013/03/05/ज्याच्या-हातून-चुका-न-झाल/

No comments:

Post a Comment