Wednesday, March 13, 2013

तुझी आठवण

कधी डोळ्यातून सांडलेली
कधी हुंदाक्यातून बोललेली
कधी सर्वांगात भिनलेली......................तुझी आठवण

कधी चिंब...पाऊस धारांसारखी
कधी खट्याळ...उनाड वाऱ्यासारखी
कधी दाहक....वणव्यासारखी................तुझी आठवण

कधी अनाहूत भेटलेल्या वळणावरची
कधी मखमली मऊसुत फुलांवरची
कधी अलवार झुकल्या पापणीवरची.........तुझी आठवण

कधी रेशमी कधी काटेरी
कधी श्रावण कधी ग्रीष्माळलेली
कधी गुलमोहोर कधी बकुळी................तुझी आठवण

कधी चांदणस्पर्शातली
कधी बेछूट पावसातली
कधी स्वैर निशिगंधातली.......................तुझी आठवण

कधी अस्वस्थतेचा उसासा
कधी तुझ्या असण्याचा दिलासा
कधी प्रेमाचा खुलासा............................तुझी आठवण
- Yogita Patil

No comments:

Post a Comment