Thursday, March 28, 2013

चांदण्यांचे प्रदेश...

आभाळातली चंद्रकोर
तुझ्या गालाच्या खळीत उतरते तेव्हा
मी विरघळत, विरघळत जातो
तुझ्या चांदण्यांच्या प्रदेशात...

मनात जपलेल्या तुझ्या मोग-याच्या आठवणी
झरु लागतात त्याच चंद्रकोरीच्या साक्षीने...

तुझ्या डोळ्यांतलं काजळ जेव्हा
स्पर्धा करतं ना माझ्या ओठांशी
तेव्हा... मनाला उधाण येतं...

चांदण्यांच्या प्रदेशात काजळाचा रंग
जसजसा मिसळत जातो ना, तसतसे
विस्कटतो आपण...

हे विस्कटणं, आवडीचं असतं, तुझ्याही आणि माझ्याही...

विस्कटलेल्या शरीरांना आवरताना आणि
विस्कटण्याचे नवे जुने संदर्भ शोधताना
नंतर दोघांनाही उमगतं,
बाकी काहीहीजुनं झालेलं असलं ना तरीही
आभाळातली चंद्रकोर आणि मनातला मोगरा
सतत तसाच नवा आहे... सतत तसाच नवा आहे...!

कवी - महेश घाटपांडे

ती रात पावसाळी...

अजून आठवे ती रात पावसाळी...
भिजुनी चिंब होतीस तू
लक्ख सौंदर्य अन साडी काळी...
जशी काळ्या रात्रीत वीज तू...

लाजून तुझे ते हसणे..
आणि हसून ते पाहणे...
मी नाही राहिलो माझाच...
नखरे होते तुझे जीवघेणे..

पण अचानक वादळ आले...
सारे काही उडून गेले...
तू गेलीस तुझ्या वाटेने ..
स्वप्न माझे मात्र भंगून गेले ...

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या....
गाऊ कुणाचे गीत मी...
नाही ती चांदरात अन...
नाही तू अन नाही तोच मी....

नम्र :
Vivek Ganesh Karandikar

Friday, March 22, 2013

सुख म्हणजे नक्की काय असतं

तिने विचारलं अरे सांग ना ??
सुख म्हणजे नक्की काय असतं???
मी म्हटलं तुझ सकाळी भिजलेल गोंडस रूप असत............
ती पुन्हा चिडून म्हणाली अरे सांग ना???
मी म्हटलं तुझ अस लटक रागावण खूप असतं..
आता मात्र अबोला, मी सुधा जरा मुद्दाम हटून बसलो..
संध्याकाळी मात्र तिला राहवल नाही...
डोळ्यात पाणी आणून घट्ट मिठी मारली तिने..
मी हलकेच अश्रू पुसले ,
आणि म्हणालो आता तरी कळलं का,
सुख म्हणजे नक्की काय असत?
ती हसली आणि म्हणाली हो...
मी म्हटलं काय???
माझे अश्रू पुसायला तू माझ्या जवळ असण.....
नसलेला दुरावा सुधा सहन न होणं...
हेच माझ सुख...

Monday, March 18, 2013

तू... फक्त तू ♥

शांत शांत दिसणारी,
अन खूप गोड हसणारी...
कधी कधी अबोल,
तर कधी कधी खूप
बोलणारी...
कसल्यातरी विचारात,
नेहमीच गुंग असणारी...
अन कोणाला ही,
फक्त एक नझर पाहताच,
त्याला हि भुरळ
पाडणारी....
तू...
कोणावरही न चिडणारी,
अन सर्वाना समजून
घेणारी...
स्वतःच दुखः नेहमीच
लपवणारी,
अन त्या चंद्राला हि फक्त,
एकटक पाहत बसणारी ..
तू...
साऱ्यांच्याच नकळत,
त्या चंद्राला हि वेड
लावणारी..
घाऱ्या डोळ्यात तुझ्या,
त्या चंद्राला हि कैद
करणारी...
चंद्राला हि तुझ्यात,
त्याचीच
चांदणी दिसणारी...
अन तुझ्या इतकी सुंदर,
त्याचीही चांदणी असावी..
असं त्या चंद्राला,
नेहमीच
वाटायला लावणारी..
तू...
फक्त तू ♥

('.')

Thursday, March 14, 2013

प्रेम

करताना ते कळत नसत आणि केल्यावर ते
उमगत नसत...♥

उमगल तरी समजत नसत पण आपल वेड मन
आपलच ऐकत नसत...

प्रेमाची भावनाच खूप सुंदर असते ती फक्त
त्या दोन जीवांनाच माहित असते...♥

लोक म्हणतात काय असत प्रेमात..,
करून बघा एकदा..,
काय नसत प्रेमात...?

प्रेम हे सांगून होत नसत...,
मित्रानो ते झाल्यावरच कळत असत..♥

दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूक
धागा असतो...

दोन हृदयांची स्पंदने
एकमेकांना ऐकवणारा एक भाव असतो...♥

प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते...

दोन शब्दात ती कधीच समजत
नसते ....♥

मला फक्त तुच हवी होतीस !!

Visit http://emailbuzzz.blogspot.in/
                     Like http://www.facebook.com/EmailBuzzz

असंच कधी तरी

असंच कधी तरी अचानक तू आयुष्यात यावं,
सगळ्यांना सोडून माझं लक्ष तुझ्याकडे जावं,

गालातल्या गालात तू असं काही हसावं,
माझ्या घरट्याला झिडकारून मनाने
तुझ्या घरट्यात रहावं

... तुझं वागणं नेहमी माझ्यासाठी"एक
रहस्य"असावं,
डोळ्यांत तुझ्या पाहून नेहमी बोलत बसावं,

कधी तरी माझ्याकडे चंद्र-तारे माग,
तुला समजवायचा मोका हवा...कधी तरी वेड्यासारखा वाग

रोज रोज तुझ्या हातून असं काही घडावं,
बिचारी मी रोज रोज तुझ्या प्रेमात पडावं,

काही बोलल्यावर तुझ्या बोटाने माज्या ओठांवर
यावं,
"असं बोलू नकोस पुन्हा"...टपोऱ्या थेंबानी डोळ्यातून गालावर यावं

कधी तू कधी मी खोटे खोटे रुसावे,
माझ्या आठवणीतले तुझे आसू मी स्वत: फुसावे,

कर कधी तरी फुलं सोडून पाकळ्यांचा हट्ट,
कधी तरी घे बोटांना बोटांच्या मिठीत घट्ट,

अपेक्षा माझ्या जास्त म्हणून होऊ नको दु:खी
बाकी नाही जमले तरी हे एक जमेल तुला नक्की,

आयुष्यभर माझा हात तुझ्या हातामध्ये धर,
मनापासून माझ्यावर खूप खूप......खूप प्रेम कर... :)

sid♥

हो रे प्रेम हे असेच असते
Visit http://emailbuzzz.blogspot.in/             Like http://www.facebook.com/EmailBuzzz

Wednesday, March 13, 2013

तुझी आठवण

कधी डोळ्यातून सांडलेली
कधी हुंदाक्यातून बोललेली
कधी सर्वांगात भिनलेली......................तुझी आठवण

कधी चिंब...पाऊस धारांसारखी
कधी खट्याळ...उनाड वाऱ्यासारखी
कधी दाहक....वणव्यासारखी................तुझी आठवण

कधी अनाहूत भेटलेल्या वळणावरची
कधी मखमली मऊसुत फुलांवरची
कधी अलवार झुकल्या पापणीवरची.........तुझी आठवण

कधी रेशमी कधी काटेरी
कधी श्रावण कधी ग्रीष्माळलेली
कधी गुलमोहोर कधी बकुळी................तुझी आठवण

कधी चांदणस्पर्शातली
कधी बेछूट पावसातली
कधी स्वैर निशिगंधातली.......................तुझी आठवण

कधी अस्वस्थतेचा उसासा
कधी तुझ्या असण्याचा दिलासा
कधी प्रेमाचा खुलासा............................तुझी आठवण
- Yogita Patil

Syllabus जरा जास्तच आहे, दर वर्षी वाटतो... :)

Syllabus जरा जास्तच आहे
दर वर्षी वाटतो...
Chapters पाहून Passing चा
Problem मानत दाटतो...

तरी lectures चालू राहतात
डोक्यात काही घुसत नहीं....
चित्र-विचित्र figures शिवाय
Board वर काहीच दिसत नाही....

तितक्यात कुठून तरी Function ची
Date जवळ येते...
Sem मधले काही दिवस
नकळत चोरून नेते...

नंतर lecturers Extra घेउन
भरभरा शिकवत राहतात...
Problems Example Theory सांगून
Syllybus लवकर संपवू पाहतात...

पुन्हा हात चालू लागतात...
मन चालत नाही....
सरांशिवाय वर्गामध्ये
कुणीच बोलत नाही...

Lectures संपून Submission चा
सुरु होतो पुन्हा खेळ..
File Complete करण्यामध्ये
फार फार जातो वेळ...

चक्क डोळ्यांसमोर Syllabus
चुटकी सरशी sampun जातो..
'PL's मध्ये वाचून सुद्धा
Paper काबरे सो...सो..च जातो??????

- ध्येय वेडा इंजिनिअर

Friday, March 8, 2013

ज्याच्या हातून चुका न झाल्या तो माणूस कसला

ज्याच्या हातून चुका न झाल्या तो माणूस कसला
ज्याच्या मनी खंत नसावी तो शूर कसला

जेव्हा रडुनी माफी मागितली ती वेळच नाही
काय मिळेल माफी मागुनी कळलेच नाही
बाजू कुणाची कधी घ्यावी न्याय न समजला
जेव्हा दोन्ही बाजू बरोबर न्याय तिथेच संपला

ज्याच्या हातून चुका न झाल्या तो माणूस कसला
ज्याच्या मनी खंत नसावी तो शूर कसला

समाज समतोला रहाण्या का हो नियम बनविले
ज्या नियमांना साथ न कुणाची ते नियम कसले
नियम जे जुनेपुराणे नवा न समजला
नियम तेही धाब्यावर बसविण्या तो मागे न हटला

ज्याच्या हातून चुका न झाल्या तो माणूस कसला
ज्याच्या मनी खंत नसावी तो शूर कसला

समाजाची चौकट देवा अशी का बनविली
जे आम्हास मान्य असुनी पुढे चाले न काही
जर माझ्या मनावर माझा ताबा नसला
घटक्यात होती मने बेचीराख विचार कसला

ज्याच्या हातून चुका न झाल्या तो माणूस कसला
ज्याच्या मनी खंत नसावी तो शूर कसला

उदया काय होईल कुणास समजले
कालच्या अश्रुनी माझे हृदय भिजले
भविष्य असेल न चांगले वर्तमानी समजला
त्याच एका तर्कावारी तो मागे हटला

ज्याच्या हातून चुका न झाल्या तो माणूस कसला
ज्याच्या मनी खंत नसावी तो शूर कसला

झुकुनी शस्त्र टाकण्यात भरुनी आली छाती
युद्धांत मागे हटन्यात का वाटावी भीती
हिंसेहून असे अहिंसा प्यारी हे जो समजला
शांती अन् प्रेमाचा संदेश देण्या पाय पुढेच पडला

‌ज्याच्या हातून चुका न झाल्या तो माणूस कसला
ज्याच्या मनी खंत नसावी तो शूर कसला

शेवटी असेच म्हणावे लढूनी की माझेच सत्य
की म्हणावे गप्प बैसोनी तुमचेच सत्य
थोरामोठ्यांच्या इशाऱ्यास ज्याने न्याय न दिला
असे इतिहास साक्षी तो तिथेच संपला

‌ज्याच्या हातून चुका न झाल्या तो माणूस कसला
ज्याच्या मनी खंत नसावी तो शूर कसला

Posted By : Acharekar Paresh
http://pareshacharekar.wordpress.com/2013/03/05/ज्याच्या-हातून-चुका-न-झाल/

Thursday, March 7, 2013

किती हा पसारा !

तुझ्या आठवांचा किती हा पसारा !
पसारा जरी, तोच माझा उबारा

नको हाक देऊस इतक्या उशीरा
मनातील तुटल्यात केंव्हाच तारा

त्सुनामीत बेजार मी भावनांच्या
मनी आस नुरली मिळावा किनारा

पुन्हा प्रेम करणे मला शक्य नाही
कशाला विषाची परिक्षा दुबारा ?

किती चेहरे मख्ख शेजारच्यांचे !
कुणाचाच नव्हता मिळाला सहारा

असा लिप्त मी आज दु:खात आहे !
जुना दाह वाटे सुखाचा नजारा

मनुष्यात फोफावला स्वार्थ इतका
कुणीही कुणाचाच नसतो दुलारा

भरायास खळगी किती राबलो मी
तुझा जीवना हाच रे गोषवारा

लिहावेस "निशिकांत" तू भाग्य अपुले
स्वतःला समजतोस तू का बिचारा ?

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com