Wednesday, April 18, 2012

मनात नेहमी तीच असते

नेहमी तिची तक्रार असते... मी म्हणे कधी बोलत नाही...
आणि तिच्यापुढे माझं मन... मी कधी खोलत नाही...
तिला कितीही म्हणालो... "तुझ्याशिवाय माझं चालत नाही..."
तिला वाटतं मस्करी करतो... मग तिही माझ्याशी बोलत नाही...
आणि असं मुकं मुकं आमच नात वाढत नाही...
का जाणे कुणास ठाऊक... माझं प्रेम तिला दिसत नाही...
नशिबाने तिचा हा अबोला फार काळ टिकत नाही...
बोलायला लागली की शब्दांना मुकत नाही...
मान्य आहे नसतील कळत... तिला माझ्या कविता...
माझी काळजी करणारी नजर... तिला कशी कळत नाही
मैत्रीण गमवायची नाहीये... म्हणुन मी बोलत नाही...
मनात नेहमी तीच असते

__ X Person

आधीच ठरले होते तुझे माझे नाते

आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
एकांतपणी ही माझ्या साथ तु येते
कळत न कळत गीत तयार होते
योगा योग म्हण नाही तर अंधश्रधा
पण लाखोंच्या दुनियेत मन तुझेच का होते ?
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
टाळतो मी , जाळतो मी, तरी ही
मनापुढे कित्येकदा हारतो मी
स्वप्नात ही तुझाच वावर
झोपेत ही मुखी नाव तुझेच येते
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
नाही कळत जगाला जगापलिकडे हे जाते
"कृष्ण, कृष्ण "करीत मीरा विष ही पीते
ठरविले होते आधीच त्याने म्हणुन हे होते
मान न मान तु पण मन गीत तुझेच गाते
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते

" ●๋? गीत ●๋? "

पहीलं पहीलं प्रेम

पहीलं पहीलं प्रेम
अचानक नकळत झालेलं
सगळ्यानपासुन लपवलेलं
तरी सुधा
 सगळ्यांना कळलेलं

पहीलं पहीलं प्रेम
पहील्यांदा अनुभवलेलं
मी तीला आणी तीने मला
प्रेम करायला शीकवलेलं
तरी सुधा
 शीकायचे काहीतरी
बाकी राहीलेलं

पहीलं पहीलं प्रेम
थोडसं निराश झालेलं
घरी कळाले तर काय
म्हणून थोडं घाबरलेलं
तरी सुधा
न घाबरता खरं
प्रेम नीभावलेलं

पहीले पहीले प्रेम
थोडक्यातच संपलेलं
तीच्या अचानक जाण्याने
दुखावलेलं
तरी सुधा
अजुनही तीच्याच
आठवणीत रमलेलं

असच काहीसं होतं
माझं प्रेम अधुरं राहीलेलं....

Mahesh parge( Mohi Raj )


काय माहीत कदाचीत



साधा सुधा पंजाबी ड्रेस
तरीही छान दीसते,

चेहर्यावर ना दुःख
ना कसली चींता असते,

आजु बाजूला न पाहता
स्वताच्याच धुंधीत चालते,

तीच्याशी बोलायची
माझी हीम्मत नसते.

पण आजकाल ती मला
पाहून गालात गोड हसते,

काय माहीत कदाचीत
ती माझ्या मनातले
प्रेम जाणते....

Wednesday, April 11, 2012

माहित आहे तू कधी प्रेम दाखविले नाहीस

माहित आहे तू कधी प्रेम दाखविले नाहीस
अश्रूंना हि तुझ्या तू
कधी सामोरी गाळले नाहीस ....

डोळ्यांत माझ्या
स्वनांचा महाल बांधून गेलीस
प्रेमाच्या फुलांना तू बोलके करून गेलीस....

प्रेम होते दोघांचे
पण....
भेट आपली घडलीच नाही

हातात हात धरून
मला सांभाळ स्वता:ला म्हणालीस
पण....????
सांभाळणे हे खूप कठीण ग

तुझ्याविना जगणे असंभवच
वाट पाहत राहील आयुष्यभर

तुझ्या आठवणी सोबत मी जगतोय
येशील तू सोडून सारे
ह्या वेड्या आशेवर

माझ्या एकांताला दूर करुनी
होशील माझीच अन फक्त माझी ....
-
© प्रशांत शिंदे

आयुष्य जगण हि एक कला आहे

Sunday, April 8, 2012

असंच राहू दे ना आपलं नातं....त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया!

असंच राहू दे ना आपलं नातं....त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया!

असंच राहू दे ना आपलं नातं
त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया;

आहोत ना एकमेकांसाठी खास
मग एकमेकांना घाव नको देऊया!

द्यायचंच असेल तर देऊ ओठांवर हसू,
कधी उदास असू, तर खुदकन हसता येईल

हृदयामध्ये थोडी अशी जागा -
जीवनाच्या वाटेवर दमलो कधी, तुझ्या सोबतीने बसता येईल

पण ज्या छळतील आपल्याला
अशा आठवणींचा गाव नको देऊया,

असंच राहू दे ना आपलं नातं ,
त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया!!

प्रेमात नेहमी दुःखच असते .
मग कश्याला त्या दुखाच्या वाट्याला जाउया

प्रेम आहे न दोघात हे
आपल्या नजरेला कळू दे ना

असंच राहू दे ना आपलं नातं
त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया!


(¯`v´¯)
.`•.¸.•´
¸.•´.•´¨) ¸.•¨)
(¸.•´(¸.•´ (¸.•¨¯`* ♥ ♥~~अल्पशः अलिप्त



All Rights Reserved © पहिलं प्रेम कसं विसरायचं ?

Saturday, April 7, 2012

आयुष्यातील मोल्यवान क्षण!!!!!

आयुष्यातील मोल्यवान क्षण!!!!!

१)आपला पहिला पगार आपल्या आई वडिलांना देणे...!!!

२)आपल्या प्रेमाचा विचार डोळ्यात पाणी आणून करने...!!!

३)जुने फोटो बघून आठवणीत रमून हसणे...!!!

४)हसत खेळत आणि भावूक गप्पा मित्रासोबत मारणे...!!!

५)ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीचा हात प्रेमाने हातात
घेवून चालणे...!!!!

६)जे आपली मनापासून काळजी करतात त्यांच्या कडून एक प्रेमळ मिठी मिळवणे...!!!

७)आपल्या पहिल्या मुलाच्या अथवा मुलीच्या कपाळावर चुंबन घेणे जेंव्हा
त्याचा जन्म होतो...!!!

८)असा क्षण जेंव्हा कोणी तरी आपल्याला मिठीत घेते आणि आपल्याला अश्रू
आवरत नाही....!!!!

हे सर्व मोल्यवान क्षण आयुष्यातून कधीच जावू नका देवू....!!!!

नेहमी सांभाळून ठेवा हृदयाच्या कोपऱ्यात कुठे तरी हे क्षण...!!!

आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात...

Thursday, April 5, 2012

तु परत येऊ नकोस

तु परत येऊ नकोस,
जुन्या आठवणी जागवायला,
आधीच खुप दिवस लागलेत,
मनावरील जखमा भरायला.....
दुःख अंतरी दाबुन,
एकांतामध्ये रडत असतो,
म्हणुनच का कोणास ठावुक,
सर्वांसोबत हसत असतो..
तु आयुष्यात परत येऊ नकोस,
तुझे स्थान मिळवायला,
आधीच फार वेळ लागलाय,
त्या सर्व आठवणी विसरायला..
पण.
काहीही असले तरी...
तुला शोधायला तरी,
नजर माझी फिरत असते,
आकाशीचा चंद्र पाहील्यावर,
तुझीच आठवण दाटुन येते..
तुला विसरण्याचा,
आत्ता कुठे मी प्रयत्न करतोय,
पण ही कवीता लिहीता लिहीता,
पुन्हा तुलाच गं मी
आठवतोय......... .........!!!!

Wednesday, April 4, 2012

कुणीतरी हव असत

कुणीतरी हव असत
कुणीतरी हव
असत ,जीवनात साथ
देनार
हातात हात घेउन ,
शब्दान्शिवाय
बोलनार्....
कुणीतरी हव
असत ,जीवाला जीव
देनार
फ़ुलातल्या सुगन्धासारख,
आयुष्यभर जपनार्......
कुणीतरी हव
असत ,हक्कान् रागावनार,
चुका ज़ाल्या तरी,मायेन
समज़ावनार........
कुणीतरी हव असत ,आपल
म्हननार
नजरेतले भाव
जानुन,आपल्याला
ओळखणार........
कुणीतरी हव
असत ,बरोबर चालणार,
कशीही वाट
असली तरी,माग न
फ़िरनार........
कुणीतरी हव
असत ,वास्तवाच भान
देणार,
कल्पनेच्या विश्वातही,
माझ्यासवे रमणार......
कुणीतरी हव
असत,मनापासुन धीर
देणार,
स्वतहाच्या दुखातही,
मला सामाउन घेणार.........
कुणीतरी हव
असत,एकान्तातही
रेन्गाळनार,
माझ्यासोबत
नसतानाही,
मझ्यासोबतच असनार....
कुणीतरी हव
असत,विश्वास ठेवणार,
माझ्या विश्वासाला.
कधीही न
फ़सवणार...........
कुणीतरी हव
असत,मला समजुन् घेनार,
आयुष्याच्या वाटेवर साथ
देशील का
विचारणार........