मी तर रोजचं रडतोय तुझी आठवण काढुन,
एकदा तुला ही माझ्यासाठी रडताना पहायचंय..
मी तर रोजचं वाट पाहतो तुझी,
एकदा मला ही तुला माझी वाट
पाहताना पहायचंय..
मी रडताना माझ्यावर हसतेस तु,
एकदा तसं मला ही तुझ्यावर हसायचंय..
रोज एकटा रडतो मी,
एकदा मला ही तुझ्या सोबत मन भरुन
रडायचंय..
तु माझी होणार नाही हे माहीत आहेमला,
तरीही या डोळ्यांनी तुला दुस-याची होताना पहायचंय..
येणा-या प्रत्येक जन्मी,
मला तुझ्याचं आठवणीत जगायचंय..
आणि पुढच्या प्रत्येक जन्मी तु
माझी होशील,
या खोट्या आशेवरचं मरायचंय..
एकदा खरचं
मला तुला माझ्यासाठी रडताना पहायचंय..
No comments:
Post a Comment