Friday, March 16, 2012

मी आता खरोखर खोटे खोटे जगायला शिकलोय ...

मी आता खरोखर खोटे खोटे जगायला शिकलोय ...

आता मी दुख: लपवायला शिकलोय..


आपल्या लोकांबरोबर खोटं बोलायला शिकलोय..


झाले गेले विसरून पुढे जायला शिकलोय..


चेहर्‍यावरती कृत्रिम भाव आणायला शिकलोय..


असंख्य जखमा मनात ठेवून खोखो हसायला शिकलोय..


ढळढळ न रडता हळूच डोळ्यातील पाणी पुसायला शिकलोय..


अंतरंगातील आठवणी तश्याच ठेवून नवीन गोष्टीकडे पाहण्यास शिकलोय..


भूतकाळात जास्त न डोकावता भविष्याचा वेध घ्यायला शिकलोय..


चुका झालेल्यांना माफ करण्यास शिकलोय..


पण आपले म्हणणे त्यांना ठाम सांगायला पण शिकलोय..


गोडी गुलाबीने वागून कामे पूर्ण करवून घेण्यास शिकलोय..


दुसर्याँचा उपयोग कसा करून घ्यावा हे नक्की शिकलोय..


आपले कोण परके कोण हे ओळखण्यास शिकलोय..


मी आता खरोखर खोटे खोटे जगायला शिकलोय ..

No comments:

Post a Comment