पांघरूणातून दिवसाचा प्रकाश आत शिरला, तेव्हा ती चमकून जागी झाली. पांघरूण भिरकावून ती ताडकन उठून बसली. गजराच्या घड्याळावर थपडा देत तिनं दोन-चार सणसणीत शिव्याही घातल्या त्या घड्याळाला. 'जाम दगा द्यायला लागलंय हे घड्याळ. आता किमान तासभर लेट झालाय. आता आवरायचं कधी, नाश्ता कधी करायचा आणि ट्रेन कशी गाठायची?' तिच्या डोक्यात हजार चिंतांचा स्फोट झाला. ते नतदष्ट घड्याळ उचलून खिडकीतून भिरकावून द्यावं की फुटबॉलसारखं लाथाडून त्याचा चुराडा करून टाकावा, अशा क्रूर विचारांच्या दुविधेत ती असतानाच बेडरूमच्या दारावर 'टक् टक्' झालं... दार उघडून तो आत आला आणि त्याला पाहून ती चाटच पडली. त्याच्या हातात चक्क ट्रे होता. ट्रेमध्ये गरम, वाफाळत्या चहाचा कप, कुरकुरीत भाजलेले बटर टोस्ट आणि 'सनी साइड अप' ऑम्लेट! 'माय माय!' ती आनंदाश्चर्यानं चित्कारली. त्यानं खास बबजीर् छाप कुनिर्सात करून 'गुडमॉनिर्ंग मादाम' असं विश केलं आणि 'एनीथिंग एल्स मादाम!' असं अतिशय विनम्रतेनं विचारलं. त्याच्या त्या अदाकारीमुळे तिला क्षणभर सगळ्या जगाचाच विसर पडला. उशिराची जाग, ऑफिसला लेट होणार वगैरे सगळ्या विवंचना काही क्षण मागे पडल्या आणि ती ब्रेकफास्टवर तुटून पडली...
... मस्तपैकी ढेकर देऊन तिनं चहाचा शेवटचा घोट संपवला. ट्रे क्षणार्धात उचलून त्यानं बाजूला ठेवला आणि विचारलं, 'काय, हाऊ वॉज द टी?'
' फँटास्टिक! आणि ऑम्लेटसुद्धा ग्रेट होतं!'
' थँक यू! आणि टोस्ट बरोबर भाजले गेले होते का?'
' अरे, एकदम परफेक्ट!'
' ही चव लक्षात राहील ना पक्की!'
' ऑफकोर्स हनी!'
' आणि ब्रेकफास्ट र्सव्ह करण्याची पद्धत!'
' ती तर फारच स्वीट होती!'
... अचानक त्याचा स्वर बदलला. रूक्ष, कोरड्या आणि व्यवहारी सुरात तो म्हणाला, 'हं! हे सगळं नीट लक्षात ठेव. गेले कित्येक दिवस मी तुझ्या हातचा ब्रेकफास्ट खातोय, पण, त्यात काहीतरी कमतरता वाटत होती. शेवटी ठरवलं, आपणच एकदा करून दाखवूयात. नाऊ प्लीज रिमेंबर ऑल ऑफ धिस आणि उद्यापासून एक्झॅक्टली अशाच पद्धतीनं मला ब्रेकफास्ट र्सव्ह झाला पाहिजे!'
त्याच्या शब्दाशब्दागणिक तिचे डोळे पाण्यानं भरत चालले होते. चेहरा लालबुंद झाला होता. गळ्यात हुंदका दाटला होता. आता रडू फुटणार इतक्यात त्यानं तिच्या डोक्यावर एक टप्पू मारला, छान हसत तिच्या गालावर ओठ टेकवून तो म्हणाला, 'ए वेडाबाई! तो जोक होता.
आपल्याला रोज भरपूर इमेल्स येत असतात त्यापैकी काही मेल नक्कीच खूप सुंदर असतात आणि परत-परत वाचण्यासारखे असतात. त्यापैकी असेच काही निवडक मेल जे तुम्हाला नक्कीच आवडतील असे. तुमच्या कविता पाठवण्यासाठी san2821.emails@blogger.com या आयडी वर इमेल करा
Friday, March 2, 2012
हे प्रेमच आहे...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment