Tuesday, March 6, 2012

जगातील तीन प्रकारची माणसं...

जगातील तीन प्रकारची माणसं...
. 'वाट' बघणारे
. 'वाट' लावणारे
. 'वाट' शोधणारे

शब्द तोच आहे ... पण त्याच्या उपयोग जो तो आपल्या हिशोबाने करतो...

काही लोक, 'जे होत ते चांगल्या साठीच होत' असं म्हणत काहीतरी होण्याची 'वाट' बघत बसतात... पण त्याला जर कृतीची साथ नसेल तर मग त्यांची 'वाट लागते'...

'
वाट' लावणाऱ्या बद्दल तर बोलायलाच नको... हे लोक पूर्ण वेळ स्वतः खाली राहून दुसऱ्याला सुद्धा खाली ओढण्यात मग्न असतात...त्यांच्या आनंदाची परिसीमा तेवढीच...

त्यातला तिसरा वर्ग महत्वाचा... 'वाट शोधनार्यांचा' ... कितीही संकटं, कितीही अडथळे आले तरी जिद्दीने नवीन वाट शोधणारे मग पुढे निघून जातात...

आपण कुठली 'वाट' निवडायची ते आपणच ठरवायचं..
इच्छा असली तर मार्ग सापडतोच !!!

No comments:

Post a Comment